टॉप न्यूज

Lockdown2 : मंत्री एकनाथ शिंदेंमुळे तामिळनाडूत अडकलेल्या 160 मराठी तरूणांना मिळाला आधार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा फैलाव टाण्यासाठी देशभरात लॉकडाऊन ( Lockdown2 ) लागू आहे. या लॉकडाऊनमुळे ( Lockdown2 ) महाराष्ट्रातील सुमारे 160 तरूण तामिळनाडूत अडकून पडले आहेत. त्यात चार मुलींचाही समावेश आहे. या सगळ्यांची राहण्याची सोय आहे. पण जेवणाचे वांदे झाले आहेत. संकटात अडकलेल्या या 160 मुलांच्या मदतीसाठी आता राज्याचे नगरविकास मंत्री मदतीला धावून आले आहेत.

‘रेल्वेमधील इंटर्नशीपसाठी आम्ही तामिळनाडूमध्ये आहोत. पण अचानक लॉकडाऊन ( Lockdown2 ) झाल्याने आम्ही अडकून पडलो आहोत. पैशांची चणचण असल्याचे जेवणाचा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते निलेश मचाले व दीपक सुरळके यांच्यामार्फत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला’ असे ज्ञानेश्वर कलाल या तरूणाने ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

‘एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून डॉ. चारूदत्त शिंदे व मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचे वांरवार फोन येत आहेत. त्यांनी आमच्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यानंतर कोईम्बतूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी आले होते. त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यामुळे या समस्येचे निवारण आज सायंकाळपर्यंत होईल’, असे कलाल यांनी सांगितले.

आम्ही सगळेजण सामान्य कुटुंबातील आहोत. त्यामुळे आमच्याकडे अगोदरच पैसे कमी होते. आता ते सुद्धा पैसे संपले आहेत. खाण्याच्या वस्तूंचे दरही भडकले आहेत. त्यातच भाषेची मोठी अडचण आहे. येथील स्थानिकांना हिंदी किंवा मोडकेतोडके इंग्रजी सुद्धा समजत नाही. आम्हाला तामीळ समजत नाही. त्यामुळे कुणाकडून मदतही घेता येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमची गंभीर दखल घेतली आहे. ते मदत करीत असल्याचे कलाल म्हणाले.

दरम्यान, कोईम्बतूरमध्ये ( Lockdown2 ) अडकलेल्या या मुलांनी गेल्या काही दिवसांपासून आपापल्या घरी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. यांत पुण्यातील शिरूर व जळगाव जिल्ह्यातील मुलांचे जास्त प्रमाण आहे. पुण्यातील शिवसेनेच्या निलेश मचाले या कार्यकर्त्याने मंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी संपर्क साधला. त्याच दरम्यान जळगाव येथील दीपक सुरळके या युवा सेनेच्या शाखाप्रमुखाने मंत्री शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या कानावर हा प्रकार घातला.

महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात ‘कोरोना’ आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात अंदाजे 15 आयएएस अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी आय. एस. कुंदन यांच्याकडे इतर राज्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांनी कुंदन यांना फोन करून तामिळनाडूतील या मुलांची समस्या सोडविण्याची सूचना केली. त्यानंतर डॉ. चारूदत्त शिंदे यांनी पाठपुरावा केला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

कुंदन यांनी तामिळनाडू सरकारमधील उच्च पदस्थ अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाला या मुलांची समस्या सोडविण्याची विनंती केली. सोमवारी कुंदन यांचे तामिळनाडू प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर आज, मंगळवारी तामिळनाडूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची दखल घेतली आहे. आज सायंकाळपासून किंवा उद्यापासून जेवणाचा प्रश्न मिटेल असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Coronavirus अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ समितीची स्थापना

Lockdown2 : लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला, नरेंद्र मोदींची घोषणा

व्हीडीओ पाकिस्तानातील, बदनामी दिल्लीतील तबलिगींची

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago