टॉप न्यूज

Lockdown2 : मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने ‘लॉकडाऊन’ धाब्यावर बसवून गाठले बीड

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown2 ) एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करण्यास बंदी आहे. परंतु नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरक्षारक्षक पोपट मिसाळ यांनी जिल्हाबंदी हुकूम धाब्यावर बसवून मुंबईवरून बीडमधील आपल्या गावी प्रवास केल्याचे समोर आले आहे.

बीडमधील चिंचपूर (ता. आष्टी) हे मिसाळ यांचे गाव आहे. बुधवारी ते गावी गेले ( Lockdown2 ) होते. परंतु गावात पोहोचताच स्थानिकांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली. काहीजणांनी तर पोलिसांनाही संपर्क साधला. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने मिसाळ तात्काळ मुंबईला परतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिसाळ पोलीस खात्यात नोकरी करतात. पोलिसांनी मिसाळ यांची नियुक्ती मंत्री शिंदे यांच्याकडे सुरक्षा रक्षक या पदावर केलेली आहे. प्रत्यक्षात मिसाळ हे शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतात.

गावी जाण्यासाठी त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना कसलीही कल्पना दिली नव्हती. एवढेच नव्हे तर, शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली नव्हती. रजा न टाकताच ते थेट गावी गेले ( Lockdown2 ) होते. परंतु गावकऱ्यांनी गोंधळ घातल्याने ते परतले.

मिसाळ यांनी केलेला हा उपद्व्याप मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पोचला. अधिकाऱ्यांनी मिसाळ यांना याबाबत विचारले असता, मी गावी गेलेलोच नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत मिसाळ यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या दिवशी मी रायगड जिल्ह्यातील कर्जतला माझ्या दाजींकडे गेलो ( Lockdown2 ) होतो. पण मी बीडला गेलो नव्हतो. मला गावावरूनही कुटुंबियांचे फोन येत आहेत. मी गावी आल्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे ते सांगत आहेत. त्यांनाही मी मुंबईतच असल्याचे सांगत आहे.

काहीजण मला दोन दिवस फोन करीत होते. त्यांना माझा फोन लागला नाही. त्यामुळे काहीजणांचा गैरसमज झाला, व त्यांनी मी गावी गेल्याचा अर्थ लावला. पण वास्तवात मी गावी गेलेलोच नाही. कुणीतरी खोडसाळपणे मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

Maharashtra government to probe Wadhawan family’s travel to Mahabaleshwar amid lockdown

तुषार खरात

Recent Posts

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

1 hour ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

2 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

23 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

23 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

1 day ago