टॉप न्यूज

सांस्कृतिक वारसा स्पर्धेत मराठमोळ्या सौंदर्यवतींची बाजी

टीम लय भारी
पुणे : भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या मृणाल एंटरटेनमेंटच्या वतीने सौंदर्यस्पर्धा आयोजित केली होती. विजेते सांस्कृतिक वारसा जपण्याच्या जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे समजते(Marathi beauties win in the cultural heritage competition).

या स्पर्धेत मिस हेरिटेज इंडिया व मिसेस हेरिटेज इंडिया अशा 2 उपस्पर्धा झाल्या. या विजेत्यांचे कौतुक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांनी मुकुट चढवून केले(The winners were lauded by actress Sonali Kulkarni and actress Hemangi Kavi).

मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर

सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

या स्पर्धेत, हर्षा शिंदे ही मिस हेरिटेज विजेती ठरळी आहे. त्याचबरोबर गौरी थोरात ही मिसेस हेरिटेज स्पर्धेत विजेती ठरली आहे.
पुण्यातील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत देशभरातील 17 युवतींनी सहभाग घेतला होता.
मिस हेरिटेज स्पर्धेत हर्षा शिंदे विजयी तर सायली काळे फर्स्ट रनर अप आणि माधुरी लोखंडे सेकंड रनर अप ठरल्या आहेत. तसेच मिसेस हेरिटेज स्पर्धेत सौ. गौरी थोरात या विजयी तर सौ. अमृता कुरार फर्स्ट रनर अप आणि सौ. प्रियांका शिंदे सेकंड रनर अप ठरल्या आहेत.

Marathmolya beauties win in the cultural heritage competition

या स्पर्धांसोबतच श्रीमती हेरिटेज इंडिया क्लासिक या स्पर्धेत शीतल पाटील विजयी झाल्या आहेत तर मोनिका खैलानी फर्स्ट रनर अप तसेच वर्षा भास्कर सेकंड रनर अप ठरल्या आहेत.

पर्यटनप्रेमींना रोहित पवार बोलवतायत कर्जत-जामखेडमध्ये

Presenting Maharashtra’s stunning and desirable beauties of 2020

या समारंभास सोनाली कुलकर्णी आणि हेमांगी कवी सोबतच मेघराज राजे भोसले, संदीप मोहिते पाटील, अंजनेय साठे, सुनीता मोडक, विजया मानमोडे, अमितराजे गायकवाड, प्रशांत जोशी आणि अजित गायकवाड यांनीही उपस्थिती लावली होती.

या स्पर्धांचे परीक्षण आरती बलेरी, पूनम शेंडे, मयुरेश डहाके, डॉ. गौरी चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम केले. त्याचबरोबर मेकअप पार्टनर म्हणून वैशाली भगोडीया यांनी साहाय्य केले. सुत्रसंचालन सेलिब्रिटी सिमरन आहुजा यांनी केले.

Mruga Vartak

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

5 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

5 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

7 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

10 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

10 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

13 hours ago