टॉप न्यूज

मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? आव्हाडांचा मोदींना सवाल!

टीम लय भारी

मुंबई :  चिनच्या हल्ल्यातील गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडून घुसखोरी झाली नसल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधानांच्या निवेदनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. शहीद झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधानांना ट्विटरव्दारे सवाल केला आहे.

तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात संघर्ष उफाळून आला. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले असून, भारतात संतप्त भावना व्यक्त होत आहे. सीमेवरील तणावावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकार कोडींत पकडण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावत चिनी सैन्यानं घुसखोरी केली नसल्याचं सांगितलं.

पंतप्रधानांनी यासंदर्भात निवेदनही केलं होतं. पंतप्रधानांच्या निवेदनावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “जर कुणी सीमेत घुसलं नाही. कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही, मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?”, असा प्रश्न आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

चीनकडून सीमेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी झालेली नसून, चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या दुष्कृत्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या मनावर आघात झाला आहे. चीनने गलवान खोऱ्याच्या भूभागावर ताबा मिळवलेला नाही. अलीकडच्या काळात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला असून देखरेखीची क्षमताही वाढवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी तिथे पायाभूत सुविधांचा विकास करण्यास 8महत्त्व दिले गेले. लष्करी दल, लढाऊ विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टर वा क्षेपणास्त्रे असोत, संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींना अग्रक्रम देण्यात आला आहे. आत्तापर्यंत चिनी सैनिकांना कोणीही आव्हान दिले नव्हेत, त्यांना कधी रोखण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता, आता जवानांनी चिनी सैनिकांना रोखले, त्यांना विविध भागांमध्ये आव्हान दिले. गरजेनुसार जवान तैनात केले जातील, प्रत्युत्तर दिले जाईल, आकाश, जमीन आणि सागरी अशा कुठल्याही मार्गाचा अवलंब करून लष्कर देशाची सीमा सुरक्षित ठेवेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं.

राजीक खान

Recent Posts

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

41 mins ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

2 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

20 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

22 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

23 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago