टॉप न्यूज

बापरे : पुन्हा एक व्हायरस मानगुटीवर बसणार?

टीम लय भारी

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु आहे. लाखो लोकांचा बळी गेला आहे. जगभरातील अनेक देश लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. “नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल,” असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

 चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी ४ ला वेगळं करण्यात आलं. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले त्यापैकी सर्वाधित डुकरांमध्ये जी ४ स्वाईन फ्लू असल्याचं दिसून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये २०१६ पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी ४ वर संशोधन सुरू केला. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, जी ४ हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली. हा व्हायरस मानवी शरीरात अधिक तीव्रतेनं पसरतो. तसंच हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी ४ स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. सामान्य फ्लूपासून रक्षण होत असलं तरी जी ४ गंभीर रुप धारण करु शकतो, असंही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या १० पैकी एका कामगारामध्ये जी ४ चा संसर्ग झाल्याचं दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी ४ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. २३० जणांच्या केल्या चाचणीत त्यापैकी ४.४ टक्के लोकांना याचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही.

New Swine Flu Found In China Has Pandemic Potential Pig G4

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

12 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

12 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

13 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

13 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

14 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

16 hours ago