मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बिनकामाचे अधिकारी, नगरविकास विभाग मंत्री कार्यालयावर नाराज

टीम लय भारी

मुंबई : अत्यंत कार्यक्षम, मनमिळाऊ व सामान्य लोकांसाठी सतत तत्पर अशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या कार्यालयातील खासगी सचिव व अन्य अधिकारी कुचकामी आहेत. बिनकामाच्या या अधिकाऱ्यांमुळे शिंदे यांना आपल्या खात्यावर अजून पकड घेता आलेली नाही.

नगर विकास विभागातील अधिकारी सुद्धा मंत्री कार्यालयावर कमालीचे नाराज आहेत. नगरविकासातील ज्ञान असलेला एका सुद्धा प्रभावी अधिकारी शिंदे यांच्या कार्यालयात नाही. त्यामुळे महत्वाच्या फाईली घेऊन विभागातील अधिकारी मंत्री कार्यालयात येतात, तेव्हा कुणाशी चर्चा करायची असा गहन प्रश्न या विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावत असतो. खासगी सचिव दिलीप ढोले यांना नगरविकास विभागाचे ज्ञान नाहीच, पण विभाग समजून घेण्यासाठी सुद्धा ते काहीच प्रयत्न करीत नाहीत. ढोले यांना प्रशासकीय कामांपेक्षा ‘अर्थपूर्ण’ कामांतच जास्त रस असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील सरकारमध्ये नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे कसलेले अधिकारी होते. त्यामुळे रणजित पाटील यांच्या कार्यालयाने प्रभावी काम केले होते. प्रशासकीय कामात तरबेज असलेले अधिकारी मंत्री कार्यलयात नेमा, असेही नगरविकासमधील अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना सुचविले आहे.

नगरविकास विभागाचे ज्ञान असलेले अधिकारी घेण्याची एकनाथ शिंदे यांची सुद्धा मानसिकता झाली आहे. त्यामुळे ढोले यांना खासगी सचिव पदावरून लवकरच नारळ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ढोले यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. दालनात एकटेच असताना भेटायला आलेल्या लोकांना ताटकळत बाहेर उभे करतात. सामान्य लोकांशी ते उद्धट वागतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे साधे सौजन्यही ते दाखवत नाहीत. भेटायला आलेल्या लोकांसाठी ढोले यांच्याकडे कसलाच वेळ नसतो,  पण अर्थपूर्ण कामासाठी येणाऱ्या पंटरना ते भरपूर वेळ देतात. ढोले यांनी इंदापूरला काही ‘संस्थाने’ स्थापन केली आहेत. मंत्री कार्यालयात राहून ते आपल्या खासगी संस्थांनांच्या हिताची कामे करीत असतात, अशाही तक्रारी आहेत. ढोले यांच्या या कार्यपद्धतीमुळे शिंदे यांचीही प्रतिमा मलीन व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे शिंदे यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली आहे. एवढेच नव्हे तर, ढोले यांना खासगी सचिव पदावर नियुक्ती करण्याबाबत आदेशही जारी झालेले नाहीत. अनधिकृतरित्या त्यांनी खासगी सचिव पदाच्या खूर्चीत बस्तान मारले आहे.

मंत्री कार्यालयाची अशी केविलवाणी स्थिती आहे. त्यामुळे ढोले व अन्य अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून त्या ऐवजी नगरविकास विभागातील उत्तम ज्ञान असलेले कार्यक्षम अधिकारी नेमण्याचा तत्वतः निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळांच्या ओएसडीने महिलेला कार्यालयाबाहेर हाकलले, महिलेने घातला गोंधळ !

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

वाढदिवसानिमित्त मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनोखे समाजकार्य; हृदयाला छिद्र असलेल्या १०० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार

तुषार खरात

Recent Posts

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

12 mins ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

41 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

1 hour ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago