राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवार यांना परत राष्ट्रवादीमध्ये आणण्यात अखेर यश मिळाले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उद्याच्या बहुमत चाचणीअगोदरच अल्प मतात आले आहे.

अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वारंवार भेटी घेत होते. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिताभाताई तसेच जावई सदानंद सुळे यांनीही अजितदादांशी संपर्क साधला होता. प्रतिभाताईंचा अजितदादा फार आदर करतात. प्रतिभाताईंनी आईप्रमाणे अजितदादांवर प्रेम केलेले आहे. प्रतिभाताई राजकीय घडामोडींमध्ये कधीही सहभागी होत नाहीत. पण त्यांनी आपल्या घरातील सगळ्यांसोबतच कौटुंबिक जिव्हाळा जपलेला आहे. विशेषतः प्रतिभाताईंचे सर्वाधिक प्रेम अजितदादांवर आहे. अजितदादा कधीही प्रतिभाताईंचा शब्द खाली पडू देत नाहीत. त्यामुळे अजितदादांचे मन वळविण्यामध्ये प्रतिभाताईंनी मोठी भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आता थोड्याच वेळात – ३.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजीनामा देतील असे बोलले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही परिणाम

सर्वोच्च न्यायालयाने उद्या बहुमत सिद्ध करण्याचा निकाल दिला आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांमागे आमदारांचा पाठिंबा राहिलेला नव्हता. अजितदादांबरोबर आलेले सगळे आमदार शरद पवारांकडे परत गेले होते. आमदारांचे पाठबळ राहिलेले नसल्यानेच अजित पवार यांनीच राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

8 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

11 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

12 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago