राज ठाकरेंची तोफ धडधडणार, बुधवारपासून ‘लाव रे तो व्हिडीओ’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येत्या 9 ऑक्टोबरला करणार आहेत. पुण्यात पहिली प्रचार सभा होईल. प्रचार काळात एकूण 15 सभा ते घेणार आहेत. या सगळ्या सभांमधून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर ते हल्लाबोल करतील, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. तरीही राज ठाकरे यांनी निवडक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. खास पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी मोदी सरकारचे पोलखोल करणारे व्हिडीओ जनतेसमोर दाखविले होते. या व्हिडीओंमुळे राज यांच्या सभा जोरात गाजल्या होत्या. त्यांच्या सभांसाठी लोकांची गर्दीसुद्धा भरपूर व्हायची.

यावेळी मनसेने राज्यभरात 100 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार नसतानाही राज ठाकरे यांनी भाषणे गाजविली होती. यावेळी तब्बल 100 उमेदवार रिंगणात असल्यामुळे राज ठाकरे जोरदार बॅटिंग करतील असे बोलले जात आहे.

ईडी कार्यवाहीनंतर पहिल्यांदाच मैदानात

मागील महिन्यात ईडीने राज ठाकरे यांच्यावर कार्यवाहीला सुरूवात केली होती. चौकशीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर राज यांनी जाहीर भाषणे केलेली नाहीत. ईडीच्या कारवाईपुढे राज यांनी नमते घेतले की काय अशीही चर्चा सुरू झाली होती. पण राज यांनी सरकारच्या विरोधात 100 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्यासाठी प्रचारसभाही निश्चित केल्या आहेत. त्यामुळे या सभा राज ठाकरे कशा गाजवतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

यावेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ ?

लोकसभा निवडणुकीत सरकारची पोलखोल करणारे व्हिडीओ राज ठाकरे प्रचार सभांमधून दाखवत होते. यावेळीही असे व्हिडीओ दाखवणार आहेत का, याबाबत मनसेच्या गोटातून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सरकारवर तोफा डागणारा बराच दारूगोळा राज यांच्याजवळ आहे. त्याचा पुरेपुर वापर ते प्रचारामधून करतील, असे या सूत्रांनी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

17 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

17 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

18 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago