टॉप न्यूज

Ram mandir : राम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी, विहिंपचे चंपत राय यांची माहिती

टीम लय भारी

अयोध्या : अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी (Ram mandir) देशातील प्रत्येक रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद एक मोहिम राबविणार असून त्याची सुरुवात नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवसापासून होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्म भूमी तीर्थस्थानचे सचिव चंपत राय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दि. 15 जानेवारीपासून घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणार आहेत. नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार असून त्यासाठी 10, 100, 1000 रुपयांचे कूपन तयार केले आहेत. देशातील चार लाख गावांमध्ये जवळपास 11 कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे. देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचे राय म्हणाले.

आयोध्येत राम मंदिर उभारण्याची तयारी सुरू आहे. यासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि गुवाहटी येथील आयआयटी, सीबीआरआय, एल अँड टी, टाटाचे इंजिनिअर मंदिराच्या भक्कम पायाबाबतच्या आराखड्यावर काम करत असल्याचेही राय म्हणाले.

अभिषेक सावंत

Recent Posts

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

6 mins ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

60 mins ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

22 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

22 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

23 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

23 hours ago