टॉप न्यूज

Corona : ५५ वर्षांपुढील १२ हजार पोलिसांना पगारी सुट्टी – अनिल देशमुख

लय भारी टीम

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र, शेकडो पोलीसांना कोरोनाची लागण झाली. काही पोलिसांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर ५० वर्षावरील २३ हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी दिली आहे, या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात दिली.

गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी त्या परिसरातील माहिती जाणून घेतली. तर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधला. यावेळी देशमुख म्हणाले, “करोनामुळे राज्यात पोलिसांचे अनेक बळी गेले आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार ६० ते ६५ लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांना करोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहितीही यावळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुण्यात येरवडा येथील कोविड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

राजीक खान

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

4 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

6 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

6 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

7 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

7 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

8 hours ago