शरद पवारांनी भरला दम : शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला ‘धडा’ शिकवू

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अवैध मार्गाने सत्तेवर आले आहे. हे गोवा, मणिपूर नाही. महाराष्ट्र अशा गोष्टी खपवून घेत नाही. योग्य असेल ते योग्यच. जे योग्य नाही ते महाराष्ट्र सहन करीत नाही. जबरदस्तीने घातलेला घाला महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अशा लोकांना आम्ही ‘धडा’ शिकवत असतो. आता आमच्यासोबत शिवसेना आहे. ‘धडा’ शिकविण्याची भाषा काय असते त्यावर मी आता बोलत नाही, अशा भाषेत सूचक तंबी शरद पवार यांनी भाजपला दिली.

उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपला गर्भित दम भरला आहे. उद्धव म्हणाले की, तुम्हाला ३० वर्षांत शिवसेना कळलेली दिसत नाही. तर मग तुम्हाला शिवसेना दाखवावी लागेल. आम्ही सत्ते आलो आहोत. आमचा रस्ता मोकळा करा. रस्ता मोकळा करणार नसाल तर मग ओलांडून दाखवू. आम्ही १६२ आमदारांची ताकद दाखवून दिलेली आहे. आम्ही सत्तालोलूप नाही. सत्येमव जयते हे आमचे ब्रीद आहे. आम्हाला सत्य दाखवायचे होते. म्हणून या १६२ आमदारांना सगळ्या जगासमोर आणले आहे. तुम्हा आणखी गैरप्रकार करयाचे असतील तरी. आम्ही तिन्ही पक्ष आणखी एकत्र येऊ. आम्ही पाच वर्षे नाही, तर पुढील २५ – ३० वर्षे एकत्र राहू. सत्तेची मस्ती गाडून टाकण्याची सुरूवात शिवरायांच्या महाराष्ट्रातून होत आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांना हयात हॉटेलमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी सगळ्या आमदारांनी संविधानाची साक्ष ठेवून भाजपला साथ देणार नसल्याची शपथ घेतली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्या आमदारांना शपथ दिली.

शरद पवारांनी आमदारांना दिला कानमंत्र

शरद पवारांनी सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पहिल्यांदा मी तुमचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो सिद्धीला नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अनुकूल भूमिका घेतली आहे. बहुमत नसताना एक सरकार सत्तेवर आले आहे. केंद्राने अनेक राज्यांत बहुमत नसतानाही सरकार स्थापन केली आहेत. कर्नाटकात, गोव्यात, मणिपूर या ठिकाणी बहुमत नव्हते. तरीही भाजपने सत्ता स्थापन केली. संसदिय पद्धतीला हरताळ फासून सत्ता स्थापन करता येते हे भाजपने दाखवून दिले. जिथे सत्ता स्थापन केली तिथे अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. काही प्रकरणांचा निकालही लागला आहे. आता आपण १६२ जण इथे आहेत. आणखीही काहीजण संपर्कात आहेत. पण लिखीत पत्र नसल्याने त्यांची नावे जाहीर करत नाही. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. पण काही आमदारांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः नवीन आमदारांमध्ये गैरसमज आहे. अजित पवारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई केली आहे. ते व्हीप काढतील. त्यातून तुमची आमदारकी जाईल अशी भीती दाखविली जात आहे. पक्ष मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. अजित पवारांना पक्षाच्या संदर्भात कोणताही अधिकार राहिलेला नाही. ज्या व्यक्तीला पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला गेला, त्या व्यक्तीला कोणताही अधिकार राहात नाही. देशाच्या संसदिय विभागाकडून मी माहिती घेतली आहे. घटना तज्ज्ञाकडून माहिती घेतली आहे. निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. पक्षातून निलंबित झालेल्या व्यक्तीने असा अधिकार राहत नाही. कोणत्याही आमदारावर कारवाई होणार नाही. ती जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे. मतदान होईल, आपण १६२ अधिक पेक्षा जास्त सदस्य असू. सत्याच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने व संसदिय प्रतिष्ठा जपणारे सरकार आपण स्थापन करू.

आम्ही १६२ जण आहोत, आता सन्मानाने आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवा. सत्तेवर आलेले सरकार अल्पमतातील आहे. शेकडो कॅमेऱ्यांसमोर आम्ही १६२ आमदारांचे संख्याबळ दाखवत आहोत.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

आमदारांनी अशी घेतली शपथ

उद्या, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन आहे. २६ नोव्हेंबर या दिवशीच डॉ. बाबासाहेबांनी देशाला संविधान अर्पण केले होते. त्याच्या आदल्या दिवशी आपण संविधानाच्या रक्षणासाठी जमलो आहोत, असे जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्या आमदारांना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी सगळ्या आमदारांकडून शपथ वदवून घेतली. आमदारांनी शपथेमध्ये त्यांचे नाव, त्यांचा मतदार संघ, त्यांचा राजकीय पक्ष यांचा उल्लेख करीत ही शपथ घेतली. सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांनी स्थापन केलेल्या सरकारशी मी प्रामाणिक राहेन. माझ्या हातून भारतीय जनता पक्षाला मदत होणार नाही याची काळजी घेईन. सर्व नेते सांगतील तेच काम आदेश माणून करेन अशी शपथ या आमदारांनी घेतली.

ओळख परेडमुळे विश्वासदर्शक ठराव कमी होणार नाही : आशिष शेलार

आमदारांनी ‘आम्ही १६२’ ही मोहिम राबविल्यानंतर आशिष शेलार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्राने पोरखेल पाहिला. ओळख आरोपीची केली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आमदारांचा व निवडून दिलेल्या जनतेचा अपमान केला आहे. या ओळख परेडमुळे भाजपचा विश्वासदर्शक कमी होणार नाही. या ओळख परेडमधून आत्मविश्वास हरविलेल्या नेत्यांचे मनोबल वाढविण्याचा टुकार प्रयत्न झाला आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं : आशिष शेलार

धनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण…

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

तुषार खरात

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

2 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

5 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

5 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

8 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

8 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

8 hours ago