शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरे, प्रदीप शर्मांचा समावेश

मुंबई :  भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच शिवसेनेनेही आपली यादी घोषित केली आहे. अपेक्षेप्रमाणे यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. निवृत्त पोलीस अधिकारी प्रदी शर्मा यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. यादीमध्ये एकूण 70 उमेदवारांचा समावेश आहे.

आयारामांना संधी

काँग्रेस व राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या विविध नेत्यांनाही शिवसेनेने आपल्या पहिल्या यादीत संधी दिली आहे. यांत भास्कर जाधव, पांडूरंग बरोरा, गौतम चाबुकस्वार, अब्दुल सत्तार निर्मला गावीत, संग्राम कुपेकर, सुरेश गोरे, विठ्ठल लोकरे यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले होते. त्यावेळी त्यांना लगेचच मंत्रीपद देण्यात आले होते. आता त्यांना अपेक्षेनुसार उमेदवारी देण्यात आली आहे.

श्रद्धा जाधव यांची निराशा

वडाळ्यामधून उमेदवारी मिळावी म्हणून श्रद्धा जाधव यांनी लॉबिंग केली होती. पण महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला आहे. भाजपने त्यांच्या यादीत कालिदास कोळंबकरांचे नाव जाहीर केले आहे. वांद्रे मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा आहे. पण या मतदारसंघातील नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

10 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago