टॉप न्यूज

राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यासाठी राज्य शासनाची केंद्राबरोबर चर्चा सुरू

टीम लय भारी

महाबळेश्वर : सुरूर ते पोलादपुर या राज्य मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राबरोबर चर्चा सुरू असल्याची माहीती मिळाली आहे. ही माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबेनळी घाटात पत्रकारांशी बोलताना दिली. (state government is in talks with the Center to convert the state highway into a national highway)

या वेळी पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील खा श्रीनिवास पाटील मकरंद पाटील व पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड हे उपस्थित होते.

निलेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर आरोप

शरद पवारांनी मोदी – योगी सरकारवर ओढला आसूड

जुलै महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर पोलादपुर दरम्यान असलेल्या अंबेनळी घाटाचे मोठया प्रमणावर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी घाटरस्ता तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी वृक्षासंह घाट रस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या. या आपत्तीमुळे घाटातील वाहतुक तब्बल दिड महीना बंद होती. तसेच या रस्त्याअभावी या भागातील 22 गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता.

या घाटाच्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी या साठी सार्वजनिक बांधकाम खाते अधिकारी यांच्या बरोबर आमदार मकरंद पाटील यांनी पाहणी करून काम युध्दपातळीवर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पाटील यांच्या सुचने प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने युध्दपातळीवर काम करून या घाटातील वाहतुक पुर्ववत केली होती.

अंबेनळी घाटातील रस्त्यांच्या नुकसानीची पाहणी अजित पवार यांनी आज केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजयकुमार मुनगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार, आदी उपस्थित होते या नुकसानीची पाहणी केल्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मुंबई ते गोवा व मुंबई ते बैंगलोर या दोन महत्वाच्या राष्ट्ीय महामार्गांना जोडणारा सुरूर ते पोलादपुर हा महामार्ग आहे.

देशातील दोन महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जोडण्याची नितांत आवश्यक्ता आहे. सध्या हा राज्य महामार्ग आहे परंतु हा रस्ता केंद्र  शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करावा या साठी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्या बरोबर चर्चा झाली आहे. डिसेंबर मध्ये नागपुर येथील अधिवेशनात या घाटरस्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो मंजुर करण्याचे काम नक्कीच केले जाईल.

 कोकण आणि घाट या दोन वेगवेगळया प्रदेशांना जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गा वरून पुर्वीप्रमाणे कशा प्रकारे वाहतुक सुरू होईल या साठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुरूर ते पोलादपुर या मार्गावरच महाबळेश्वर हे राज्याचे लाडके पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दोन्ही बाजुंनी पर्यटकांना येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणारा आहे.

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

Lakhimpur Kheri Protest Will Lead To Change Of UP Government: Congress Leader

 ज्या भागातील रस्त्यांवर अधिक वर्दळ आहे त्या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. महाबळेश्वरकडे येणारे सर्वच रस्त्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली त्या त्या वेळी संकटावर मात करण्यासाठी मनापासुन प्रयत्न करणारे सहकारी आहेत, त्या सर्वांच्या मदतीने या आपत्तीवर मात करून परिस्थिती पुर्वपदावर आणु असा विश्वासही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला

या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Mruga Vartak

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

9 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

9 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

10 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

13 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

14 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

14 hours ago