टॉप न्यूज

सुशांत प्रकरणाचा  तपास डॉ. दाभोलकर हत्या प्रमाणे होऊ नये : शरद पवार

टीम लय भारी

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आजच (20 ऑगस्ट) सात वर्ष पूर्ण झाली.  या हत्येचा तपास सीबीआयकडे असूनही तो पूर्ण झालेला नाही. बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास देण्यात आला. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणती होणार नाही, अशी आशा शरद पवार यांनी ट्विटरवरुन  व्यक्त केली. (Sharad Pawar reaction on Sushant Singh Rajput Death Case transferred to CBI)

सुशांत आत्महत्या प्रकरणातील आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल” असा विश्वास शरद पवार यांनी ट्विटरवरुन व्यक्त केला आहे.  “मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.” अशी आशाही पवारांनी व्यक्त केली.

सीबीआय तपासाबाबत पवारांची भूमिका…

“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना 50 वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही.” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती.

राजीक खान

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

7 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

8 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

9 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

9 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

10 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

10 hours ago