टॉप न्यूज

तामिळनाडू विधानसभा निवडणूक: रजनीकांत कमल हसन एकत्र येणार ?

टिम लय भारी

कोलकाता : पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी मे महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.सुपरस्टार रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Hassan) यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हे दोन दिग्गज एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे. ते म्हणाले, की, माझ्याप्रमाणेच तेदेखील बदलासाठी लढत आहेत. रजनीकांत यांनी पक्षाबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आम्ही फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर आहोत. एकत्र काम करणे शक्य असल्यास आम्ही त्याबाबत निश्चितच विचार करू. परंतु, या दोन अभिनेत्यांनी एकत्र येण्याचा विचार रजनीकांत यांच्या चाहत्यांना रुचलेला नाही. रजनीकांत फॅन असोसिएशनने यास विरोध केला आहे.

लोकसभेत कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयम’ पक्षाला ३.७७ टक्के मते मिळाली होती. ते सध्या निवडणुकीत एकटेच लढणार आहेत. त्यामुळे त्यांना भाजपची ‘बी’ टीम असल्याचे बोलले जात आहे. हसन हे ‘डीएमके’ आण‍ि ‘एआयएडीएमके’ या पक्षांची मते ओढू शकतात. परिणामी भाजपलाच फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago