देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही उद्धव ठाकरे शपथविधीचे निमंत्रण देणार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर येऊ नयेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आकाश पाताळ एक केले. परंतु याच फडणवीस यांना उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे सन्मानपूर्वक निमंत्रण देणार आहेत. आपले चुलत बंधू राज ठाकरे यांनाही ते निमंत्रण देणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. सध्याही ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी चिमटा घेतला. राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. देशभरातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, प्रमुख राजकीय नेते यांनाही शपथविधीचे निमंत्रण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय वैर आहे. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले. त्यानंतर राजकीयदृष्ट्या ते कधीही एकत्र आले नाहीत. परंतु दोघांमध्ये अद्यापही कौटुंबिक एकोपा आहे. उद्धव ठाकरे रूग्णालयात भरती झालेले असताना राज ठाकरे त्यांना पाहायला गेले होते. राज यांनी स्वतः ड्रायव्हिंग करीत आपल्या गाडीतून उद्धव यांना घरी आणले होते. राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे असा संपूर्ण परिवार आवर्जून उपस्थित होता. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढविली तेव्हा त्यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार नव्हता. त्यामुळे कौटुंबिक एकोपा जपण्याचे ठाकरे कुटुंबियांनी नेहमीच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

उद्धव – राज एकत्र येण्याची चर्चा

उद्धव ठाकरे व राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात असे बोलले जात आहे. भाजपविरोधातील सगळे पक्ष महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले आहेत. राज ठाकरे हे सुद्धा भाजपचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांच्या तुफान टीका केली होती. मोदी – शाह – फडणवीस यांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्यातील अनेक पक्षांनी कंबर कसली होती. हे सगळे पक्ष आता एकत्र आले आहेत. फक्त राज ठाकरे यांचा मनसे अद्याप बाहेर आहे. उद्धव – राज यांच्यातील राजकीय मतभेद या एकमेव कारणामुळेच राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये नाहीत. परंतु आता हे दोघेही एकत्र येऊ शकतात असे बोलले जात आहे. मनसेचा एकमेव आमदार विधानसभेत आहे. या आमदाराच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन राज ठाकरे सहकार्य करू शकतील असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल : ‘यांच्या’ निर्णयामुळे पक्षाचे नुकसान

उद्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार, सोनिया गांधींसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख बदलली, २८ नोव्हेंबरला होणार शपथविधी

तुषार खरात

Recent Posts

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

45 mins ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

19 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

21 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

22 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago