व्हिडीओ

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated in the Lok Sabha elections). पण पराभव स्विकारण्याची डॉ. सुजय यांची अद्याप तरी तयारी नाही, असंच दिसतंय. कारण त्यांनी थेट EVM आणि VVPAT वरच संशय घेतलाय. मुळात केंद्रात व राज्यात विखे पाटील यांच्या भाजपचीच सत्ता आहे. वडिल राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल खात्याचे मंत्री आहेत. महसूल खातं हे फार मोठं खातं आहे. कारण जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार असे दांडगे अधिकारी महसूल मंत्र्यांच्या कार्यकक्षेत येतात. थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाकडे काम करणारे हे महत्वाचे अधिकारी महसूल खात्याचेच असतात. म्हणजेच, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कार्यरत असलेले निवडणूक अधिकारी सुद्धा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बापाचे चाकर असल्यासारखेच आहेत. संपूर्ण नगर जिल्ह्यात विखे पिता पुत्राचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारकाळात संपूर्ण सरकारी यंत्रणा डॉ. सुजय विखे पाटील यांना कशी मदत करीत होती, हे लपून राहिलेले नाही. प्रचारकाळात सुजय विखे व निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद निर्माण झालेले आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांचा साधारण २८ हजारांनी विजय झाला. सुजय विखे यांचा पराभव झाला. हा पराभव विखे यांच्या पचणी पडलेला नाही. त्यातून निलेश लंके व सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुद्धा झाली होती. सुजय विखेंना पराभव पचनी पडलेला नाही, याचं हे पहिलं उदाहरण. आता त्यांनी EVM आणि VVPAT वर शंका घेतलेली आहे. त्यांनी श्रीगोंदे व पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी १० मतदान केंद्र, तसेच शेवगाव – पाथर्डी, कर्जत – जामखेड व राहूरी या ठिकाणचे प्रत्येकी पाच मतदारसंघातील EVM व VVPAT वर संशय व्यक्त केलाय. एका मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रूपये या प्रमाणे या सगळ्या मतदान केंद्रांतील फेरमतमोजणीसाठी १८ लाख ८८ हजार रुपये निवडणूक आयोगाकडे अदा केले आहेत. त्यांना आता या ठिकाणी फेरमतमोजणी हवीय. डॉ. सुजय विखे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या आजोबांची आठवण ताजी झाली आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे – पाटील यांनी यशवंतराव गडाख व शरद पवार यांच्या विरोधात अशीच तक्रार केली होती. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. यशवंतराव गडाख यांना पवार यांनी सलग दोन वेळा तिकीट दिले होते. दोन्ही वेळा गडाख निवडून आले होते. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यात विखे यांचा पराभव झाला होता. पण प्रचारकाळात शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी आपली बदनामी केली, असा दावा करीत बाळासाहेब विखे पाटील न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यावेळची निवडणूक रद्दबातल ठरविली होती. बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्यावेळच्या भूमिकेशी सुसंगत अशीच डॉ. सुजय विखे पाटीय यांनी आता भूमिका घेतलेली आहे. EVM व VVPAT विषयी सामान्य जनतेच्या मनात मोठा संशय आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक यंत्रणा आपल्या कह्यात आणलेली आहे. भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने निवडणूक आयोग काम करतो, असा विरोधकांचा आरोप गेल्या सहा – सात वर्षांपासून आहे. आता डॉ. सुजय विखे यांनीही EVM वर संशय व्यक्त केल्यामुळे एक प्रकारे नरेंद्र मोदींवरच संशय व्यक्त करण्यासारखे आहे. बघूया निवडणूक आयोग आता काय भूमिका घेतो ते.

टीम लय भारी

Recent Posts

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 mins ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

2 hours ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

3 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

3 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

24 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

1 day ago