व्हिडीओ

सरकारविरोधात पुणेकरांची बंदची हाक; पुण्यात शुकशुकाट

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राज्यपालांसहित इतर राजकीय नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. याचविरोधात पुण्यात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, मुस्लिम संघटना, सर्वच समाजाचे नागरिक, व्यापारी, रिक्षा चालक, हॉटेल्स व्यापारी सहभागी झालेले पाहायला मिळाले. माहात्म्यांचा अवमान केल्याच्याविरोधात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामुळे पुण्यात शुकशुकाट पाहायला मिळाला. दररोज गजबजाट असणाऱ्या पुण्यातील बाजारांमध्ये सर्वच दुकाने बंद ठेऊन यावेळी या मोर्च्याला पाठिंबा देण्यात आला.

या मूक मोर्च्याला पुण्यातील डेक्कन गरवारे पूल येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमान केल्यानंतर उदयनराजे यांनी निषेध करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या मूक मोर्च्यात पुण्यातील तरुणाईसह अनेक लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळाले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घेऊन त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी आणि जे राजकीय नेते असे वक्तव्ये करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

15 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

4 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago