व्हिडीओ

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे(Ramdas Athawale, Prakash Ambedkar, Chhagan Bhujbal, Mahadev Jankar, Gopichand Padalkar are agents of RSS). या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी रिपब्लीकन पक्षाचे (सेक्यूलर) अध्यक्ष शाम दादा गायकवाड यांची मुलाखत घेतली. बहुजन चळवळीतील नामवंत मान्यवरांनी एकत्रित येवून प्रागतिक रिपब्लीकन आघाडीची स्थापना केलेली आहे. या आघाडीमध्ये विचारवंत, माजी सनदी अधिकारी, साहित्यिक अशा मातब्बर मंडळींचा समावेश आहे. या आघाडीने ‘महाविकास आघाडी’ला पाठींबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हे सरळसरळ संविधानाचे उल्लंघन करीत आहे. ते खोटं बोलतात. हिंदूत्वाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरविण्याचे काम चालू आहे.

सगळ्या समाजासाठी हे अत्यंत घातक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्याची गरज आहे. दुर्दैवाने, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर अशी मंडळी आरएसएसची एजंट बनलेली आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेण्याचा या मंडळींना कसलाही अधिकार नाही. त्यांची कथनी आणि करणी यांत मोठा फरक आहे, अशा आशयाची नाराजी शामदादा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली. अठरा पगड जाती, कामगार, दलित, शोषित, महिला या सगळ्या घटकांनी सध्या नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या विरोधातील मते एकगठ्ठापणे महाविकास आघाडीला द्यायला हवीत. त्यातच देशाचं, महाराष्ट्राच व समाजाचं हित सामावलेलं आहे, अशी भावनाही शाम दादा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.

टीम लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

51 mins ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

1 hour ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

2 hours ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

2 hours ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

2 hours ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

3 hours ago