लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात
तासगाव : विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमनताई पाटील उमेदवार आहेत. त्या दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनांत सहानुभूती आहे. पण शेवटी कार्यक्षमता व शिवसेना – भाजपची विकासाची चळवळ हे मुद्दे महत्वाचे आहेत. त्यामुळे जनतेने महायुतीच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती आमदार निलमताई गोऱ्हे यांनी केले.
तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अजित घोरपडे यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांसी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, केंद्रात व राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार उत्तम काम करीत आहे. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे विकासाला आणखी गती मिळेल. तासगाव – कवठेमहांकाळचे उमेदवार अजित घोरपडे हे मेहनती आहेत. सिंचनासारखे प्रकल्पासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तासगाव – कवठेमहांकाळच्या जनेतेने त्यांना निवडून द्यावे, असे आवाहनही निलमताईंनी केले.
[box type=”shadow” align=”alignright” class=”” width=””]नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…