जागतिक

जगभरात कोरोनाचा उद्रेक; विमानतळावर घेणार खबरदारी

जगभरात कोरोनाचा  (Corona) उद्रेक वाढल्यानंतर आता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 24 डिसेंबर (शनिवार) पासून विमानातील एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर (Airport) आगमनानंतर थर्मल स्क्रीनिंग (रॅंडम पोस्ट अराइव्हल) चाचण्या केल्या जातील. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्राने योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ती देशभरातील सर्व विमानतळांवर लागू करणे आवश्यक आहे. विमानप्रवाशांना कोरोना चाचणीची सॅंपल्स द्यावी लागणार असून त्यानंतरच त्यांना विमानतळावर प्रवेश दिला जाणार आहे. पॉझिटीव्ह रिपोर्टची काॅपी shoc.idsp@ncdc.gov.in येथे सबमीट केली जाईल. त्यानंतर संबधीत अहवाल प्रयोगशाळेत तपासून संबधीत राज्य अथवा केंद्रशासीत प्रदेशाकडे पाठवला जाणार आहे.

जर एखादा प्रवासी कोरोनाबाधीत आढळला तर त्याचे नमुने जिनोमिक टेस्टींगसाठी INSACOG प्रयोगशाळा नेटवर्ककडे पाठवले जाणार आहेत. विमानतळावर कोरोना चाचण्यांबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालय ठेवेल. कोरोना चाचण्यांची बिले संबंधित विमानतळावीरल विमानतळ आरोग्य कार्यालयांना सादर केल्यावर कोरोना चाचण्यांच्या खर्चाची परतफेड या विमान वाहतूक मंत्रालय मंत्रालयाकडून केली जाईल. तसेच केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाला असे देखील कळविण्यात आले आहे की, कोरोना चाचण्यांची बिले शासकीय अनुदानच्या दराने तसेच एकसमान दरान केली जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रॅंडम पोस्ट अराइव्हल चाचण्यांसाठीन नुमने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ज्या मार्गदर्शक सुचना आल्या आहेत त्यांचे पालन केले जाईल. मुंबईत सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असून लसीकरणाचे प्रमाण देखील जास्त आहे. तसेच रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदे म्हणाले, नागरिकांनी घाबरून जावू नये; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश

चीन मध्ये कोरोना रुग्णांना कारमध्ये अॅडमीट करण्याची वेळ; राज्य सरकारने काय खबरदारी घेतली आहे?

ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

चीन मध्ये आढळलेला बी.एफ 7 हा व्हायरसचा प्रकार भारतात यापूर्वी देखील आढळला होता. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसुन कोरोनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे. सध्या मास्क घालने बंधनकारक नसले तरी ज्येष्ठ नागरीक, आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे फायदेशीर ठरेल. राज्यात सर्व जिल्ह्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी पंचसुत्रीचा अबलंब करणे आवश्यक असून जिल्हा प्रशासन आणि महापालिकांनी रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणाची पंचसुत्री वापरणे आवश्यक आहे. तसेच कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज ठेवणे, आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देणे आवश्यक आहे. जीनोम सिक्वेन्सिंग स्क्रीनिंगवर, कोविड लसीकरण देखील भर देणे गरजेचे आहे.

तसेच रुग्णालयांमधील व्हेंटीलेटर, ऑक्सिजन प्लांट, आयसीयू सुसज्ज ठेवण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांना सुचित करण्यात आले आहे. तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, त्यांना प्रशिक्षण देणे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करुन तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेवून प्रत्येक जिल्ह्यात कोरोना नियंत्रण समितीच्या आढावा बैठका घेऊन कोरोना नियंत्रणाची तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

41 mins ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

1 hour ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

2 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

2 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

2 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

6 hours ago