जागतिक

जागतिक मातृभाषा दिन: मातृभाषेच्या संरक्षणासाठी युनेस्कोचे जागतिक धोरण!

जगभरात आज, २१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल प्रचार आणि जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या निमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधतेला चालना देण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. (International Mother Language Day)

विशेषतः, जगभरात 6,700 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात परंतु किमान 40% नामशेष होण्याचा धोका आहे. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी वर्गाची (शाळांची) महत्त्वाची भूमिका आहे! यासाठी यूनेस्को देशांना मातृभाषा-आधारित शिक्षण लागू करण्याचे आवाहन केल्याचे ट्विट केले आहे. एकंदरीत यूनेस्कोने समाजाला जागरूक केले आहे. यावर जागतिक स्तरावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

मातृभाषेच्या रक्षणासाठी आणि मातृभाषेच्या प्रसारासाठी वेगवेगळे धोरण ठरवले जाते. यंदा यूनेस्कोकडून आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण यूनेस्को भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल वी. शर्मा (Vishal V. Sharma) यांनी ट्विट करत शेअर केले आहे.

जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने 22 भाषा बोलल्या जातात. भारतात सुमारे 1300 मातृभाषा आहेत. मात्र देशातल्या अनेक भागात हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. हिंदी भाषेच्या या वृद्धीमध्ये हिंदी सिनेमाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात हिंदी ही दुसऱ्या क्रमाकांची भाषा आहे. मराठी आणि हिंदीमध्ये 70 टक्के शब्द समान आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे भारतामध्ये 2 लाख 60 हजार लोकांनी आपली पहिली भाषा म्हणून इंग्रजीची नोंद केली आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, असं या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. मुख्यतः आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.

यामागचा इतिहास काय?
21 फेब्रुवारी 1952 साली ढाका युनिवर्सिटीच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतिला जोरदार विरोध केला होता. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार देखील केला. मात्र वाढत्या विरोधामुळे अखेर तत्कालिन पाकिस्तान सरकारने बांग्ला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृती निमित्ताने यूनेस्कोने पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago