जागतिक

खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक

जी २० परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे शुक्रवारी भारतात आगमन झाले आहे. खलिस्तानी धमक्यांवर बोलताना  त्यांनी सांगितले की, ‘खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत काम करत आहे. यूके कोणत्याही प्रकारच्या हिंसाचार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या कृती करणाऱ्यांना थारा देणार नाही. खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया संपवण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करत आहेत’. असेही ते म्हणाले.

‘हा (खलिस्तानी मुद्दा) खरोखरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे… मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, यूकेमध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरेकी किंवा हिंसाचार स्वीकारार्ह नाही. आणि म्हणूनच आम्ही भारत सरकारसोबत हा दहशतवाद संपवण्यासाठी खूप जवळून काम करत आहोत. ‘पीकेई’ (खलिस्तान समर्थक अतिरेकी) यांचा अंत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय वंशाचे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी 2022 मध्ये यूकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. सुनक यांनी G20 च्या भारताच्या अध्यक्षपदाची प्रशंसा केली आणि शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी भारत ‘योग्यवेळी, योग्य देश’ असल्याचे सांगितले. ‘आमचे सुरक्षा मंत्री नुकतेच भारतात आले होते… आमच्याकडे गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी एकत्र काम करणारे गट आहेत, जेणेकरुन आम्ही अशा प्रकारच्या हिंसक अतिरेक्यांना उखडून टाकू शकतो. खालीसतं असो वा अन्य दहशतवाद मी यूकेमध्ये ते सहन करणार नाही.’ असेही सुनिक यांनी सांगितले.

यूकेचे मंत्री, टॉम तुगेंधत हे गेल्या महिन्यात दिल्लीत होते आणि त्यांनी लंडनमधील भारतीय राजनैतिक कर्मचार्‍यांची सुरक्षा करणाऱ्यावर आमचे प्राधान्य आहे.युकेमधील कोणत्याही भारतीय वंशाच्या व्यक्तीला खलिस्तानी कट्टरपंथी आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न जरी केला तर तो आम्ही हाणून पाडू असेही असेही त्यांनी सांगितले होते. याची आठवण सुनिक यांनी करून दिली.

पंजाबमधील पोलिसांनी कट्टरपंथी धर्मोपदेशक अमृतपाल सिंगचा शोध सुरू केल्यानंतर मार्चमध्ये, फुटीरतावादी घोषणा देत खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला आणि इमारतीच्या समोरील खांबावरून राष्ट्रध्वज खाली पाडला. ब्रिटनच्या वाणिज्य मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

हे सुद्धा वाचा
भूमि पेडणेकरच्या थँक्यू फॉर कमिंग चित्रपटात मांडलेल्या ऑरगॅजम विषयाबाबत तुम्हाला माहिती आहे का?
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!
आजी-आजोबांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय


गेल्या महिन्यात भारत आणि यूके चर्चेच्या “अंतिम टप्प्यात” असल्याचे वृत्त आले होते. आज, सुनक म्हणाले, ‘पंतप्रधान (नरेंद्र) मोदी आणि मी सर्वसमावेशक आणि महत्त्वाकांक्षी व्यापार करार संपन्न झालेला पाहण्यास उत्सुक आहोत…’, संशोधक, वैज्ञानिक समुदाय, विद्यापीठे यांच्यातील सहकार्य वाढवण्याबद्दल उत्सुक आहोत. यूके आणि भारत हे दोन देश तंत्रज्ञानात महासत्ता बनू शकते, असेही सुनिक यांनी सांगत, जर उभय देशांनी एकत्र काम केले तर आपण नोकऱ्या निर्माण करू शकतो, नवीन व्यवसाय निर्माण करू शकतो आणि जगातील काही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करू शकतो. असेही सुनिक म्हणाले.

 

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

20 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago