26 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरमहाराष्ट्रआजी-आजोबांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आजी-आजोबांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आपल्या आई-वडिलांपेक्षाही जास्त आपल्याला कोणी प्रेम करत असेल, तर सर्वांच्या तोंडी आजी आजोबांचं नाव येतं. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आई-वडील दोघंही नोकरदार असतील तर मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आजी आजोबांवर येते. आपल्या नातवाचा, नातीचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या आजी आजोबांचे ऋण फेडण्यासाठी राज्य सरकारने ‘आजी आजोबा’ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १० सप्टेंबर पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आजी आजोबा दिवस’ साजरा केला जाईल. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मुलांच्या सांगोपांग जडणघडणीत आजी आजोबांचाही मोलाचा वाटा असतो. नातवंडाचा दिवसभर सांभाळ करणं, त्यांच्या आवडीनिवडी जपणं यातच आयुष्य वेचणाऱ्या आजी-आजोबांसाठी १० सप्टेंबरला शाळेतून सांस्कृतिक कार्यक्रम आखले जातील. या बाबतीतच्या आवश्यक सूचना सरकारने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आजी-आजोबांना आमंत्रित केले जाईल. विद्यार्थीच आपल्या आजी-आजोबांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, या हेतूनेच आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा 
‘गदर२’ की ‘जवान’ कोण तोडणार ‘बाहुबली’२ चा रेकॉर्ड?
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि एकनाथ शिंदेच झाले ट्रोल
नकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका

आजी आजोबा कार्यक्रमाचे स्वरूप
सकाळ आणि दुपारच्या अधिवेशनात विद्यार्थी आजी आजोबांना शाळेत घेऊन येतील. आपल्या मित्र परिवाराशी आणि गुरुवऱ्यांशी विद्यार्थीच आजी आजोबांशी ओळख घडवून देतील. संगीत, गायन, नृत्य, वादन आणि चित्रकला असे विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडूनच केले जाईल. यासह आजी-आजोबांसोबत विटी-दांडू, संगीत खुर्ची आदी कार्यक्रमाही घेतले जातील. ज्यावेळी इतिहासातल्या महत्त्वाच्या गोष्टी, पर्यावरणाचे महत्त्व आदीबाबतही मुलांना माहिती दिली जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी