निवडणूक

ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी

शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शिवसेनेचे नेते व पदाधिकार्‍यांनी शालिमार येथील पक्ष कार्यालयात जोरदार शक्तिप्रदर्शन करत वाजे यांना दिल्लीत पाठवणार अशी ग्वाही दिली.शिवसेनेकडून नाशिक लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार याबाबत अनेक दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुरु होती. बुधवारी (दि.२७) शिवसेना ठाकरे पक्ष कार्यालयाने सोळा लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी जाहिर केली. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार वाजे य‍ांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी मध्यवर्ती कार्यालयात वाजे यांचा सत्कार करत त्यांना निवडूण देण्याचा शब्द दिला.(Rajabhau Waze has been fielded by the Thackeray faction.)

सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बाळासाहेबांनी बोट धरुन मोठ झालेला भाजप शिवसेनेला संपवायला निघाला असून आम्ही संपणार नाही असे सांगत लोकसभा निकालातून भाजपला महाराष्ट्राची माती काय असते हे कळेल असा इशारा दिला. माजी आ. वसंत गिते धनशक्ति विरुध्द जनशक्ति असा लढा असून ज्यांनी महाराष्ट्राची राख रांगोळी केले, पक्ष फोडले, घर फोडले मराठा विरुध्द अोबीसी असा वाद लावला त्यांना आम्ही गाडणार असा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी आम्ही
आदेशाचे पालन करणारे सैनिक असल्याचे सांगत सर्व संभ्रम दूर करत विजयासाठी काम करा असे आवाहन केले.राजाभाऊ निस्वार्थी व निष्ठावान व्यक्तिमत्व आहे.सिन्नरमधील उद्योजक पाठिशी असून सर्वोपरी मदत करु
असे आश्वासन दिले. निवडणूक जिंकण्याचे गणित व मित्रपक्ष अंदाज घेऊन राजाभाऊना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक डि.जी.सूर्यवंशी व मुशीर सैयद यांनी सर्व ताकद पाठिशी उभी करुन वाजे यांना विजयी करु अशी ग्वाही दिली.

भगवा लोकसभेवर फडकवणार : वाजे

लोकसभेसाठी उमेदवारासाठी मला भाग्य लाभलं.उद्याच्ता लढाईत मी विजयी होणार. मधला काळ पक्षासाठी अवघड होता. अनेकांनी राजकारण शिकवायचा प्रयत्न केला. पण मला निष्ठा विकून विकास नको असे मी सांगितले. पक्ष मोठ होण्यासाठी जबाबदारी मी स्विकारतो. महाविकास आघाडीेने संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. मी जरी लढत असलो तरी तुम्ही स्वत: उमेदवार आहात असं समजा.यश संपादन झाल्यानंतर जबाबदारी माझ्यावर राहिल असे आश्वासन त्यांनी शिवसैनिकांना दिले.

महाविकास आघाडीेने संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. मी जरी लढत असलो तरी तुम्ही स्वत: उमेदवार आहात असं समजा.यश संपादन झाल्यानंतर जबाबदारी माझ्यावर राहिल असे आश्वासन त्यांनी शिवसैनिकांना दिले.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

10 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

10 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

10 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

10 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

10 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

14 hours ago