शिक्षण

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश देताना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी : धनंजय तानले

टीम लय भारी

पुणे : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देणे हि योजना अत्यंत महत्वाची व चांगली आहे. परंतु सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे अशी अट असल्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीचे ठरत आहे(Certificate of income should be abolished admitting students for Dhangar students).

आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देताना पालकाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे अशी अट घातली असून ती पालकांना जाचक ठरत असल्यामुळे रद्द करावी अशी मागणी पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा धनगर माझाचे संस्थापक धनंजय तानले राज्य सरकारकडे केली आहे(Income less than Rs 1 lakh should be abolished as it is a burden on parents).

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र सरकारचा सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

आयसीएमआर प्रमुखांनी केले कोविड चाचणीच्या वेळेचे शंकानिरसन

FPJ-Ed: Pediatric Task Force leaves decision on reopening of schools to Maharashtra govt

ग्रामीण भागात रोजगार करणार्‍या मजुराचेसुद्धा वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या पुढे आहे. पण वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे मुलांना शिक्षण देणे अडचणीचे ठरते आहे. तसेच ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडूनही 1 लाखाच्या आतचे उत्पन्न प्रमाणपत्र देताना पालकांची अडवणूक होत असल्याचे दिसून येत आहे(Annual income of a laborer working in a rural area is more than 1 lakh).

शिवाय ही योजना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर असल्यामुळे आदिवासी मुलांना प्रवेशासाठी उत्पन्नाची अट दिसून येत नाही. असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसीचे मंत्री विजय वड्डेट्टीवार व सामान्य प्रशासन मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे देऊन केली आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

16 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

33 mins ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago