व्यापार-पैसा

नाशिक मनपाची २०० कोटी कर कमाई

मागील सुमारे २५ वर्षांपासून नाशिक मनपात नोकरभरती झालेली नाही तर ऐन मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर मनपाचे कर उपायुक्त श्रीकांत पवार यांची निवडणुकीमुळे अचानक बदली झाल्याने प्रभारी कार्यभार उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांना आयुक्तांनी देऊन कर वसुलीचे उद्दिष्ट दिले तरी मनपाने यंदा विक्रमी कर वसुली करुन २०० कोटींची कमाई केली आहे.महापालिकेने चालू आर्थिक वर्षात विक्रमी दोनशे कोटींची वसुली मालमत्ता करातून केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे. पश्चिम विभागातील ७० गाळेधारकांकडे २०१४ पासून चार कोटींची थकबाकी पडून आहे. त्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांकडून लवकरात लवकर थकबाकी यावी. याकरिता प्रयत्न सुरु आहेत.(Nashik Municipal Corporation earns Rs 200 crore tax )

पश्चिम विभागातील गाळेधारकांकडे थकीत भाडे आहेत. शनिवारी त्यांनी तीस लाखांचा भरणा केला असून त्यांनी उर्वरीत चार पाच दिवसात चार एक कोटी रुपये अदा करणार आहे. तसेच युको बँक त्यांच्याकडील थकीत असलेली दोन कोटींचे भाडे महिन्याभरात भरणार आहेत. – विवेक भदाणे, प्रभारी उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा
भाडेकरूंनी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. परंतु पालिकेच्या करसंकलनने आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी गाळे सील करण्याचा इशारा दिला होता. तर शनिवारी महापालिकेचे पथक जाताच भाडेकरूंनी तीस लाख भरले तर एक कोटीची रक्कम लवकरच भरणार असल्याचे सांगितले आहे. नाशिक महापालिकेच्या करसंकलन विभागाला २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातून २१० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. तर पाणीपट्टीचे ७५ कोटींचे उद्दिष्ट आहे. दरम्यान यंदा पालिकेने मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे. तब्बल दोनशे कोटींचा टप्पा गाठला असून ही वसुली ऐतिहासिक ठरली आहे. विशेषतः आतापर्यंतची सर्वाधिक वसुली कररसंकलन विभागाने करुन दाखवली आहे.

तर मालमत्ता कराची वसुली २०५ कोर्टीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गतवर्षी मालमत्ता करातून १८८ कोटींची वसुली झालेली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराचे टार्गेट वाढून दिले होते. मालमत्ता करवसुलीत उपायुक्त श्रीकांत पवार यांनी केलेले सुक्ष्म नियोजन कामी आले आहे. शासकीय कार्यालयासह वर्षानुवर्षे बड्या थकबाकीदारांकडून रक्कम वसूल केली. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षात दोनशे कोटींपर्यंत मालमत्ता कराचा आकडा पोहचू शकला. दरम्यान उपायुक्त पवार यांची बदली झाल्यानंतर करसंकलनचे उपायुक्त म्हणून विवेक भदाणे यांनी कार्यभार हाती घेताच त्यांनी बड्या थकबाकीदारांना दणका दिला. गाळेधारकांसह रविवार कारंजा येथील युको बँकेकडे दोन कोटींची असलेली थकबाकी बँक महिन्याभरात भरणार आहे. यामुळे पालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

6 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago