क्रिकेट

IPL 2023 : SRH vs DC सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी; Video Viral

सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. स्पर्धेत दोन सामने जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीचा त्यांच्याच घरात पराभव केला. मुख्यत: काल झालेल्या DC आणि SRH यांच्यातील सामन्यादरम्यान काही चाहत्यांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चाहते एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू होता. यादरम्यान दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दिल्ली आणि हैदराबादचे चाहते एकमेकांना लाथा-बुक्के मारत असल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी काही लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण क्रिकेट चाहत्यांनी ऐकले नाही. ते एकमेकांना ओढत भांडत राहिले. या मारामारीचे नेमके कारण कळू शकले नाही. पण सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते.

दिल्लीच्या पराभवाची मालिका आयपीएल 2023 हा हंगाम दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे चालला आहे. सुरूवातीचे पाच सामने गमावल्यानंतर संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला. पण आता पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नरच्या संघाचा विजयरथ थांबल्याचे पाहायला मिळत आहे. सलामीवीर पृथ्वी शॉचा खराब फॉर्म संघाची डोकेदुखी वाढवत आहे. खरं तर पृथ्वीला त्याच्या खराब फॉर्ममुळे मागील काही सामन्यांपासून बाकावर बसावे लागत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 197 धावा केल्या. 198 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना घाम फुटला आणि संघ केवळ 188 धावा करू शकला. अखेर हैदराबादने 9 धावांनी शानदार विजय मिळवला. दरम्यान, कर्णधार डेव्हिड वॉर्नर खाते न उघडताच माघारी परतल्यानंतर फिल सॉल्ट (59) आणि मिचेल मार्श (63) यांनी डाव सावरला. अखेरच्या काही षटकांमध्ये अक्षर पटेलने 14 चेंडूत 29 धावांची स्फोटक खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 6 बाद केवळ 188 धावा केल्या आणि सामना गमावला.

हे सुद्धा वाचा:

IPL 2023: अर्शदीपची ‘स्टम्पतोड’ बॉलिंग करतेय लाखोंचे नुकसान!

IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!

IPLच्या सामन्यांचे द्विशतक करणारा धोनी पहिला कर्णधार!

SRH vs DC, IPL 2023, Clashes between fans during SRH vs DC match; Video Viral, cricket, sports, IPL 2023 : Clashes between fans during SRH vs DC match; Video Viral

Team Lay Bhari

Recent Posts

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

2 mins ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

17 mins ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

4 hours ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

4 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

5 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

5 hours ago