क्रिकेट

वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , नाशिक जिल्हा संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर, लागोपाठ तिसऱ्या विजयासह गट विजेतेपद पटकावले. तिसऱ्या साखळी सामन्यात नाशिक महिला संघाने सांगलीवर २१ धावांनी विजय मिळवला. तर पूना क्लबने बी वर मोठा विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले.संदीप फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात नाशिकने प्रथम फलंदाजी करत ईश्वरी सावकारच्या फटकेबाज नाबाद ७७ धावांच्या जोरावर २ बाद १३५ धावा केल्या. प्रियांका घोडके व नाबाद रसिका शिंदे यांनी प्रत्येकी २१ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजांनी सांगलीला ३ बाद ११४ इतकीच मजल मारून दिली.(Senior Women’s Invitational T20 Cricket Tournament)

श्रुती गीते, ऐश्वर्या वाघ, प्रियांका घोडके व पूजा वाघ यांनी फलंदाजांना मोकळीक दिली नाही , तर रसिका शिंदे व ईश्वरी सावकारने प्रत्येकी १ गडी बाद केला. बीड व पूना क्लब पाठोपाठ नाशिक जिल्हा महिला संघाने सांगलीवरहि विजय मिळवला. विजयी संघाला प्रशिक्षक भावना गवळी , निवड समिती चे शर्मिला साळी , भाविक मनकोडी यांचे मार्गदर्शन लाभले.या विजयाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा महिला संघ व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसऱ्या सामन्यात पूना क्लबच्या ७ बाद १३५ समोर बीडला सर्वबाद २३ इतकीच मजल मारता आली. पूना क्लबची कर्णधार कविता नवगिरेने ४७ धावा व ३ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाला ११२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. तिला साक्षी राजपुतने नाबाद २९ धावा तर संजना वाघमोडेने ३ बळी घेत साथ दिली . बीडच्या आरती जाधवने पूना क्लबचे ३ बळी घेतले.

समीर रकटे

सेक्रेटरी,

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.

टीम लय भारी

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

29 mins ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

1 hour ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

2 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

22 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

23 hours ago