32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रिकेटवरिष्ठ महिला आमंत्रितांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट < Cricket > असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , नाशिक जिल्हा संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर, लागोपाठ तिसऱ्या विजयासह गट विजेतेपद पटकावले. तिसऱ्या साखळी सामन्यात नाशिक महिला संघाने सांगलीवर २१ धावांनी विजय मिळवला. तर पूना क्लबने बी वर मोठा विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले.संदीप फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात नाशिकने प्रथम फलंदाजी करत ईश्वरी सावकारच्या फटकेबाज नाबाद ७७ धावांच्या जोरावर २ बाद १३५ धावा केल्या. प्रियांका घोडके व नाबाद रसिका शिंदे यांनी प्रत्येकी २१ धावा केल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजांनी सांगलीला ३ बाद ११४ इतकीच मजल मारून दिली.(Senior Women’s Invitational T20 Cricket Tournament)

श्रुती गीते, ऐश्वर्या वाघ, प्रियांका घोडके व पूजा वाघ यांनी फलंदाजांना मोकळीक दिली नाही , तर रसिका शिंदे व ईश्वरी सावकारने प्रत्येकी १ गडी बाद केला. बीड व पूना क्लब पाठोपाठ नाशिक जिल्हा महिला संघाने सांगलीवरहि विजय मिळवला. विजयी संघाला प्रशिक्षक भावना गवळी , निवड समिती चे शर्मिला साळी , भाविक मनकोडी यांचे मार्गदर्शन लाभले.या विजयाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा महिला संघ व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसऱ्या सामन्यात पूना क्लबच्या ७ बाद १३५ समोर बीडला सर्वबाद २३ इतकीच मजल मारता आली. पूना क्लबची कर्णधार कविता नवगिरेने ४७ धावा व ३ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाला ११२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. तिला साक्षी राजपुतने नाबाद २९ धावा तर संजना वाघमोडेने ३ बळी घेत साथ दिली . बीडच्या आरती जाधवने पूना क्लबचे ३ बळी घेतले.

समीर रकटे

सेक्रेटरी,

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी