क्राईम

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची पाच कोटी रुपयांची मालमत्ता मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) (ED action) जप्त केली आहे. या कारवाईअंतर्गत ईडीच्या (ED action) पथकाने पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापे टाकले. व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत रोकड, मुदतठेवीच्या पावत्या, दागिने असा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ईडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.(ED action in investor fraud case)

व्हीआयपीएस कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्मय बडघे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणुकदारांना जादा परतव्याचे आमिष दाखवून व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि साथीदारांनी फसवणूक केली होती. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला खुटे टाळे लावून पसार झाला. गुंतवणुकदारांना परतावा दिला नसल्याने शेकडो गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात खुटे आणि साथीदारांनी 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याबाबत ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (वय 43) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ईडीकडून याप्रकरणात तपास करण्यात येत होता. गेल्या वषी जून महिन्यात ईडीने पुणे, मुंबई, तसेच अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी, तसेच अहमदाबादमधील ग्लोबल ?फिलेट बिझनेस या वित्तीय संस्थांवर कारवाई केली होती. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालायने ही कारवाई केली होती. पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) कायद्यान्वये कारवाई केली होती. विनोद खुटेच्या कुटुंबीयँच्या नावे असलेली आठ कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल ऍफिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या पाच सदनिका, दोन मालमत्ता, दोन कार्यालये आणि नगर येथील दोन हेक्टर जमीन जप्त करण्यात आली होती. मार्च महिन्यात ईडीने छापे टाकून 24 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे याने वेगवेगळय़ा नावे दोन वित्तीय संस्था सुरू करुन गुंतवणुकदारांची 100 कोटी रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक केली होती. हवालाच्या माध्यमातून त्याने ही रक्कम परदेशात पाठविल्याचे तपासात उघडकीस आले होते. आतापर्यंत 70 कोटी 89 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे दुबईत पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ?फिलेट बिझनेस कंपनीने गुंतवणुदारांना गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविले होते. विनोद खुटेने परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार (फॉरेक्स) टेडिंग कंपनी सुरू केली होती. गुंतवणुदारांकडून आलेले पैसे त्याने कान्हा कॅपिटल कंपनीत वळविले होते. त्याने गुंतवणुकादारांकडून आलेले पैसे बनावट कंपनीच्या नावाने उघडलेल्या खात्यात वळविले होते. त्याने जवळपास १०० कोटी रुपयांची रक्कम हवालामार्गे परदेशात पाठविले होते.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

15 mins ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

1 hour ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

2 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

3 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

3 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

4 hours ago