क्राईम

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग (Fire breaks) विझवित असताना सिलिंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले.स्टेट बँक चौपाटी येथे अनेक हातगाड्यांवर किरकोळ खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे या ठिकाणी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत कायम गर्दी असते. मंगळवारी मध्यरात्री चौपाटीवरील एका मालगाडीला अचानक आग लागली.(Fire breaks out at State Bank Chowk Chowpatty in Cidco )

या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दल आणि अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अंबड पोलिसांना स्टेट बँक चौपाटीचे अध्यक्ष राहुल गणोरे यांनीही माहिती दिली. चौपाटी येथे अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुप आणि चायनीज टाऊनचे मालक किशन थापा यांच्या मालकीच्या गाड्यांना आग लागली. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम सुरु असताना सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान राजेश हाडस, राहुल गणोरे, अमोल खांडरे जखमी झाले. नवीन नाशिक अग्निशमनच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली.

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

2 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

3 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

4 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

6 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

7 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

8 hours ago