क्राईम

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in prevents) आले. आतापर्यंत जिल्ह्यात वर्षभरात १० बालविवाह (child marriage) रोखण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे १६ वर्षाच्या मुलीचा विवाह रायगड नगरातील एका युवकाशी होणार होता. याची माहिती मिळाल्यानंतर एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी बाल आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत आयोगाकडून शहानिशा करण्यात आली असता तक्रारीत तथ्य आढळून आले.(Nashik Igatpuri taluka prevents child marriage)

याविषयी बाल आयोगाच्या सायली पालखेडकर यांनी, माहितीची खातरजमा केली असता मुलगी अल्पवयीन म्हणजे नववीत शिकत असल्याचे सांगितले. पालकांकडून वेळेवर लग्नाचे स्थळ बदलण्यात आले. बाल आयोगाकडून मुलीचे आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी बालविवाह थांबवत असल्याचे मान्य केले.

आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात चार तर जिल्ह्यात १० बालविवाह रोखले गेले आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील सर्वजण एकत्रित काम करत आहेत.दरम्यान, ग्रामीण भागात कायद्याविषयी असणारे अज्ञान, गरीबी, मुलाकडून टाकण्यात येणारा दबाव यामुळे बालविवाह होत असल्याचे सांगितले जाते. बालविवाह केल्यास पालकांना कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते, कमी वयात विवाह केल्याने मुलीला भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक समस्यांना त्रास द्यावा लागू शकतो, याविषयी अधिक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे निष्पन्न होत आहे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना, युवावर्ग यांची मदत घेता येऊ शकते, असाही मतप्रवाह आहे

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

4 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

4 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

5 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

8 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

9 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

9 hours ago