क्राईम

नाशिक जिल्हयात देविभक्तांचा अपघात : पाच ठार

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना एक भीषण अपघात नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व परिसरात अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास नाशिक- दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीची जोराची धडक झाली.( Five killed in road accident in Nashik district )

नाशिक – दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.टायर फुटल्यानंतर कार प्रथम दुचाकीला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील 2, तर कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 3 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो जीपमधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मृतांत द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 05) दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत.

टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago