28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमनाशिक जिल्हयात देविभक्तांचा अपघात : पाच ठार

नाशिक जिल्हयात देविभक्तांचा अपघात : पाच ठार

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना एक भीषण अपघात < Accident > नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व परिसरात अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास नाशिक- दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीची जोराची धडक झाली.( Five killed in road accident in Nashik district )

नाशिक – दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.टायर फुटल्यानंतर कार प्रथम दुचाकीला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील 2, तर कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 3 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो जीपमधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मृतांत द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 05) दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत.

टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी