क्राईम

नाशिक चांदगिरी येथे पाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

खेळताखेळता बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत (water tank) पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना (दि. २७) सायंकाळी चांदगिरी येथे घडली. रागिनी महेंद्रकुमार वर्मा(वय: चार वर्ष पाच महिने, रा. माेगल मंजिल, रेल्वे ट्रॅक्शनजवळ, बालाजीनगर, एकलहरा राेड) असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकराेड पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.(Four-year-old girl drowns in water tank in Nashik’s Chandgiri)

रागिनीचे वडील महेंद्रकुमार व तिची आई माेलमजुरी करतात. ते शनिवारी सकाळी ठेकेदारामार्फत चांदगिरी येथील मारुती मंदिरासमाेर नव्याने सुरु असलेल्या बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी आले हाेते. सायंकाळी पाच वाजता वर्मा कुटुंब मजुरी करत असतांना या बंगल्याच्या जवळ बांधकामाला पाणी मारण्यासाठी बांधलेल्या पाण्याची टाकीत रागिनी खेळतांना पडली. ती पूर्णत: बुडाल्याने नाकाताेंडात पाणी जाऊन गतप्राण झाली.

तिचे आई वडील कामाच्या गडबडीत असताना रागिनी नजरेसमाेर येत नसल्याने त्यांनी आरडाओरड करुन शाेध घेत असताना पाण्याच्या टाकीत पाहिले असता, ती निपचित पडल्याचे दिसून आले. तत्काळ पाण्यातून बाहेर काढून तिला बिटकाे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घाेषित केले. याप्रकरणी तपास पोलीस हवालदार संताेष पाटील करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

12 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

12 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

14 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

17 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

18 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

20 hours ago