क्राईम

खुटवड नगर येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग

खुटवड नगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला (electronics shop) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग (Fire) लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. खुटवड नगर भागातील मुख्य रस्त्या लगत असलेल्या देवआशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक लागली. या दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला दिली. वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहचले. सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले.(Fire breaks out at electronics shop in Khutwad Nagar)

त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने नवीन नाशिक व मुख्यालय येथून प्रत्येकी दोन दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एकूण सहा बंबांननी दहा फेऱ्या मारून अडीच तासात यश मिळवले.सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

खुटवड नगर भागातील मुख्य रस्त्या लगत असलेल्या देवआशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक लागली. या दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला दिली. वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहचले. सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने नवीन नाशिक व मुख्यालय येथून प्रत्येकी दोन दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एकूण सहा बंबांननी दहा फेऱ्या मारून अडीच तासात यश मिळवले.

या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. आग लागली त्यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये एकूण पाच ते सात कर्मचारी उपस्थित होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तसेच सौम्य लाठीमार देखील करावा लागला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

अपघातानंतर नाशिक महापालिकेला जाग; शहरातील 856 होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

मुंबई शहरात दोन दिवसांपूर्वी जाहिरात होर्डिंग (hoardings) कोसळून झालेल्या अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे जाग…

20 mins ago

उज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड; गायकवाड यांचा जाहीरनामा, निकम यांच्या नैतिकवर प्रश्नचिन्ह !

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड, तर भाजपकडून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात…

34 mins ago

महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस (Rain) हजेरी  लावत आहे. राज्यात…

43 mins ago

आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार..; राजू पाटील

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणारे आहे.…

1 hour ago

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

2 hours ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

2 hours ago