क्राईम

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ गुंतवणुकीतून कोट्यवधींचा गंडा

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुख्य संशयिताने फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला केंद्र सरकारच्या ‘डीआरडीओ’चे बनावट प्रमाणपत्र व ‘एइआरबी’चा परवाना दाखविला होता. त्यामुळे संशयितांची मोठी साखळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, मुख्य संशयिताचा शोध नाशिक पोलिसांनी सुरू केला आहे. इंदिरानगर परिसरातील लॅण्ड डेव्हलपर राहुल शांताराम सावळे यांची संशयितांच्या टोळीने तब्बल तीन कोटी ४६ लाखांना फसवणूक केली आहे.चंदनकुमार बेरा (रा. कोलकाता) हा मुख्य संशयित असून, रघुवीरकुमार ओंकार संधू (रा. पुणे), मुकेशकुमार ,कांतिकुमार, बप्पीदास, आशिष रॉय आणि अरुप घोष (सर्व रा. कोलकाता) हे त्याचे साथीदार आहेत.(Kolkata-based suspects dup Nashik-based businessman of crores of rupees from uranium investment)

‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’ मध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष संशयितांनी सावळे यांना दाखविले. त्यासाठी सावळे यांना कोलकाता येथे संशयितांनी बोलावून घेत ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही सांगितले होते. फिर्यादी सावळे हे कोलकाता विमानतळावरून चिनार पार्क येथील संशयितांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संशयित बेरा याने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमाणपत्र, यासह परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचा (एईआरबी) परवाना दाखविला होता. ‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’ मध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष संशयितांनी सावळे यांना दाखविले. त्यासाठी सावळे यांना कोलकाता येथे संशयितांनी बोलावून घेत ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही सांगितले होते. फिर्यादी सावळे हे कोलकाता विमानतळावरून चिनार पार्क येथील संशयितांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संशयित बेरा याने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमाणपत्र, यासह परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचा (एईआरबी) परवाना दाखविला होता.त्यामुळे सावळे यांचा संशयितांवर विश्वास बसला. मात्र, ही प्रमाणपत्रे व कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंदिरानगर पोलिस मुख्य संशयितांच्या मागावर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे सावळे यांचा संशयितांवर विश्वास बसला. मात्र, ही प्रमाणपत्रे व कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंदिरानगर पोलिस मुख्य संशयितांच्या मागावर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago