क्राईम

संतापजनक: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेची मातीत तोंड दाबून हत्या

मंचर येथील पांढरीमळा वस्तीत एका वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटून तोंड मातीत दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय 78) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. पोलिस पथकाने शोध घेतला असता, घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. मृत वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल चोरून नेण्यात आले होते. त्यामुळे दागिन्यांच्या हव्यासापोटी मातीत तोंड दाबून वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकिस आली. सदर प्रकारानंतर परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पांढरीमळा मंचर येथे अंजनाबाई प्रभाकर बाणखेले या घरी एकट्याच राहतात. त्यांना तीन मुले व तीन मुली असून, मुले कामानिमित्त मुंबई येथे राहतात. एक परिचयाचा कामगार बाणखेले यांना नेहमीच मदत करण्यासाठी घरी येत असे. बाणखेले यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. त्याच्यावर या कामगाराची नजर होती. सोमवारी दुपारी दोन वाजता अंजनाबाई बाणखेले या घरातून निघून गेल्या. मुंबईतून मुलाने फोन केला. मात्र, तो बंद लागल्याने, त्यांनी शेजाऱ्यांना शोध घेण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बाणखेले यांनी त्या हरवल्याची तक्रार मंचर पोलिसांत दिली.

येथून जवळच उजवा कालवा गेल्याने तेथेही शोध घेण्यात आला. या दरम्यान संबंधित कामगाराने उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका व्यक्तीला दागिने दिले होते. ही गोष्ट समजल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या कामगाराला फोन केला असता त्याने परराज्यात असल्याचे सांगितले. उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. संशय बळावल्यानंतर कसून चौकशी केली असता, वृद्धा अंजनाबाई बाणखेले यांचा खून केल्याचे त्याने कबूल केले व घटनेची जागा सांगितली.

पोलिस पथकाने शोध घेतला असता, घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान रुग्णवाहिकेतून मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मंचर पोलिसांनी पंचनामा केला असून, परराज्यात गेलेल्या संशयित आरोपी कामगाराला परत आणण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हे सुद्धा वाचा : 

माता न तू वैरिणी: प्रियकराच्या मदतीने निर्दयी मातेने घेतला लेकराचा जीव

CID फेम अभिनेत्री चंद्रिका साहाची नवऱ्याविरोधात पोलिसांत धाव

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

crime news marathi, Manchar old woman was killed by pressing her face into the soil and rob her jewelry

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

2 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

2 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

15 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago