क्राईम

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

टीम लय भारी

मुंबई : मुंबईजवळच्या बोईसरमधील खोदाराम भागात राहणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी (Palghar Boisar MBBS Student Missing) बेपत्ता होऊन दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप तिच्याशी संपर्क झालेला नाही. तर ज्या तरुणासोबत 22 वर्षीय सदिच्छा मनिष साने (Sadiccha Sane) हिचा सेल्फी सापडला आहे, त्या मितू सिंहने आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. 29 नोव्हेंबरला मेडिकल प्रीलिम्ससाठी मुंबईतील कॉलेजला गेलेल्या सदिच्छाशी 15 दिवसांपासून संपर्क होऊ न शकल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे.( MBBS student goes missing from Mumbai for two weeks)

सदिच्छाचा शोध घेण्यासाठी आता सोशल मीडियासह बँड स्टॅन्डच्या बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले आहेत. सदिच्छाने आपल्या बॉयफ्रेण्ड असल्याचं सांगितल्याचा दावा लाईफगार्ड म्हणून काम करणाऱ्या मितू सिंह याने केला आहे, मात्र कुटुंबीयांनी तो खोडून काढला.

परमबीर सिंह यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल

Crime : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह; कांदिवली परिसरात खळबळ

काय आहे प्रकरण?

22 वर्षीय सदिच्छा साने परीक्षेनिमित्त 29 नोव्हेंबरला बोईसरमधील घरुन निघाली. मात्र ती परीक्षा हॉलवरही पोहोचली नाही. तर त्या दुपारपासून तिचा फोन बंद येत आहे. तिचे शेवटचे लॉकेशन बँड स्टॅन्ड आले. तिला जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या मितू सिंहने पाहिले होते.

कोण आहे मितू सिंह

मितू सिंह याचा वांद्रे परिसरातील बँड स्टॅन्ड भागात मित्स किचन नावाचा फूड स्टॉल आहे. फूड स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांसोबत सेल्फी घेऊन आपण ते सोशल मीडियावर पोस्ट करतो. म्हणजे आपल्या फूड स्टॉलची प्रसिद्धी होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. अशा प्रकारे अनेक जणांसोबत काढलेले सेल्फीही मितने पोलीस आणि सदिच्छा सानेच्या कुटुंबियांनाही दाखवले.

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेंड पसार

http://www.uniindia.com/mumbai-police-to-seek-custody-of-gangster-suresh-pujari/west/news/2593594.html

वांद्रे पोलिसांनी मितचे दोन्ही मोबाईल ताब्यात घेत बोईसर पोलिसांकडे पाठवल्याची माहिती आहे. भायखळ्यामधील हॉस्टेलची सदिच्छा राहत असलेली खोली पोलिसांनी सील केली आहे. तसंच तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, सदिच्छाला कुठलाही बॉयफ्रेंड नाही, मितू सिंह कदाचित तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणून तिने त्याला टाळण्यासाठी आपल्याला बॉयफ्रेण्ड असल्याचं खोटं सांगितलं असावं, असं तिच्या लहान भावाने सांगितलं.

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago