क्राईम

नाशिकमध्ये नेपाळी ‘कूक’चा गच्चीवर गळा चिरून खून

सातपुरच्या कामगारनगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हॉटेलमधील तरूण ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. महेंद्र प्रकाश सार्की (२२,रा. कौशल्या व्हिला, गुलमोहर कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरमधील गुलमोहर कॉलनीमध्ये कौशल्या व्हिला नावाची अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे दहा ते बारा लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेंद्र हादेखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो माेबाइलवरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.( Nepalese ‘cook’ strangled to death in Nashik )

सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरमधील गुलमोहर कॉलनीमध्ये कौशल्या व्हिला नावाची अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे दहा ते बारा लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेंद्र हादेखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो माेबाइलवरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.

गुलमोहर कॉलनीमधील रस्त्यावर सकाळी मृतदेह एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आल्यानंतर जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या डायल ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, शेखर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकही घटनास्थळी पोहचले. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आढळून आले
मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, शेखर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकही घटनास्थळी पोहचले. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आढळून आले
मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago