क्रीडा

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्सला बसला मोठा झटका, संपूर्ण हंगामातून बाहेर गेला ‘हा’ खेळाडू

IPL2024 मध्ये मंगळवारी आपला दुसरा सामना जिंकणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा झटका लागला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज शिवम मावी आता संपूर्ण आयपीएल 17 हंगामातून बाहेर आहे. शिवम दुखापतीमुळे हंगामातून बाहेर गेला आहे. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season) आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे आपल्या संघाला सोडून गेले आहे, लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या फिटनेसवर पण प्रश्न विचारले जात असतांना आता शिवम मावी संघाला सोडून गेला आहे.(IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)

मयंक यादवची गोलंदाजी पाहून चाहत्यांना आली शोएब अख्तरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केले अनेक मीम्स

लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मावी या हंगामातून बाहेर पडल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. फ्रँचायझीने त्यांच्यासाठी संदेशही लिहिला की, शिवम, तू जोरदार पुनरागमन करशील आणि या मार्गावर आम्ही तुझ्यासोबत आहोत. उल्लेखनीय आहे की शिवम मावीला लखनऊने 6.4 कोटी रुपये देऊन करारबद्ध केले होते. शिवम गेल्या वर्षी गुजरात टायटन्सचा भाग होता पण एकही सामना खेळला नाही. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने आयपीएलमधून बाहेर आहे. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)

LSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

शिवम मावीने लखनऊ  सुपर जायंट्स व्हिडिओमध्ये संपूर्ण हंगामातून बाहेर राहण्याबाबत सांगितले की, ‘मला याची खूप आठवण येईल. दुखापतीनंतर मी पुनरागमन केले आणि माझ्या संघासाठी काही सामने खेळण्याचा विचार केला. पण दुर्दैवाने दुखापतीमुळे मला जावे लागले. अशा दुखापतीतून पुनरागमन कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी क्रिकेटपटूला मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. यातुन तुम्ही कसे लवकर बरे होणार? हे सगळे प्रश्न मनात येतात.” (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)

IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

तुम्हाला सांगते की, या हंगामात लखनऊच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी मार्क वुड आणि डेव्हिड विली यांनी आपली नावे मागे घेतली होती. वुडला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बोलवून घेतले.  तर विलीने वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव मागे घेतले. वुडच्या जागी शामर जोसेफ आणि विलीच्या जागी मॅट हेन्रीने संघात प्रवेश केला. आता शिवम मावीच्या रूपाने संघाला चालू हंगामात तिसरा धक्का बसला. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)

काजल चोपडे

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago