क्राईम

पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक

पुणे कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचं हळू-हळू उघड होत चाललंय. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार (blood reports of accused) केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली. अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार (blood reports of accused) केल्याचा प्रकार समोर आला.(Pune hit-and-run case: Two doctors of Sassoon Hospital arrested for tampering with blood reports of accused)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलंय. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाईल. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आज 27 मे पत्रकार परिषदेत कारवाईची सविस्तर माहिती देणार आहेत.

त्यामुळं केली दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट : अपघात झाल्यानंतर येरवाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीनं त्याची ब्लड टेस्ट करणं गरजेचं होतं. परंतु, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी मुलाला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयानं पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. तसंच हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडं पाठवण्यात आले. दोन्ही रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago