क्राईम

शिक्षकाचा अश्लील कारनामा; विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण

टीम लय भारी

चेन्नई : पोलिसांनी चेन्नईतील एका खासगी शाळेतील गणिताच्या शिक्षकाला अटक केली आहे (Police Arrested Maths Teacher) . या शिक्षकाने इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअरकेल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे(Teacher sends porn video to students’ WhatsApp group).

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अंबत्तूरच्या आर मथिवानन नावाच्या गणिताच्या शिक्षकाने जवळपास दशकभरापूर्वी एका खासगी शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. सार्वजनिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

वसईतील डॉक्टरच्या घरी 14 लाखांचा दरोडा, वॉचमन गँगला 48 तासात ठोकल्या बेड्या

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

या पार्श्‍वभूमीवर, कोविड महामारीदरम्यान ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या शिक्षकाने शुक्रवारी कथितरित्या या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केला. या ग्रुपमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही अॅड होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुपवर हा व्हिडिओ पाहताच विद्यार्थ्यांना धक्का बसला आणि लगेचच त्यांनी शाळेच्या मॅनेजमेंटकडे याबाबत तक्रार केली. शाळेनं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि मथिवानन यांनीही आपण हा व्हिडिओ शेअर केल्याचं मान्य केलं. मात्र आपण दारूच्या नशेत व्हिडिओ शेअऱ केल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर पोलिसांनी मथिवाननला पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत अटक केली. मथिवाननची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितले.

एसटी कर्मचारी, ठाकरे सरकार आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस,

Maharashtra: Posing as Army officers, cyber crooks cheat businessman of Rs 18.83 lakh

दुसऱ्या एका घटनेत तिरुपूरमध्ये पालकांच्या आणखी एका गटाने शाळेच्या व्यवस्थापनाला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केलं आहे. या शिक्षकाने शाळेच्या कॅम्पसमध्ये 5 वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलीने पालकांना याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तत्काळ तिरुपूरमधील चिन्नापुदूर येथे इतर पालकांसह मिळून निषेध केला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago