Categories: क्राईम

सुपारी देऊन नानावलीत पेट्रोलच्या जळत्या बाटल्या फेकल्या

भद्रकाली भागात घरे व वाहने जाळपोळीला आता राजकारणाचा धूर निघू लागला आहे. यात कथित गुंड वा नेत्याने पाच सराईतांना जाळपोळीसाठी सुपारी देत पेट्रोल पुरविल्याचे समोर येत आहे.सुपारी देऊन नानावलीत (Nanavali) पेट्रोलच्या जळत्या बाटल्या (Burning bottles of petrol) फेकल्या. कारण भद्रकाली पोलिसांनी तपास करुन पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानुसार मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु झाला असून मत विभाजन, दहशत पसरविण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.(They gave betel nuts and threw burning bottles of petrol in Nanavali)

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी संजय गावडे (२८, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (३१), प्रविण बाळू कराटे (२४, दोघे रा. विद्यानगर, मखमलाबाद), आकाश राजू साळुंके (२४, रा. दत्त चौक, सिडको), विजय सुरेश लोखंडे (२८, रा. आडगाव) अशी अटकेतील समाजकंटकांची नावे आहेत. सनी, प्रशांत व प्रविण यांना शनि शिंगणापूर येथून पकडण्यात आले. तर आकाश व विजय यांना नाशकातून पकडण्यात आले. प्राथमिक तपासात परिसरात दहशत पसरवण्यासाठी त्यांनी जाळपोळ केल्याची कबुली दिली.

गुरुवारी (दि.१६) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास वाकडी बारव, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासमोर, नानावली व शितळा देवी मंदिर परिसरात अज्ञात टोळक्याने ९ दुचाकी, एक ट्रक, टेम्पो अशा वाहनांना आग लावून जाळपोळ केली होती. जाळपोळीत तीन कारचेही किरकोळ नुकसान झाले होते. तसेच जहांगिर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून झोपलेल्या कुटुंबाचे घर जाळण्याचा प्रयत्न टोळक्याने केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तपास पथके नेमली. परिसरातील सीसीटीव्ही, यांत्रिक तपास, माहितगाराच्या माहितीनुसार संशयितांचा माग काढला. यानंतर आता पाचही संशयितांना शुक्रवारी (दि.२४) न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष नुरुटे, विक्रम मोहिते, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सहायक उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, हवालदार नरेंद्र जाधव, सतिष साळुंके, संदीप शेळके, पोलिस नाईक कय्युम सैयद, लक्ष्मण ठेपणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

टीम लय भारी

Recent Posts

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 hours ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 hours ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

2 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

2 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

2 days ago

लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं…

2 days ago