28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeक्राईमसुपारी देऊन नानावलीत पेट्रोलच्या जळत्या बाटल्या फेकल्या

सुपारी देऊन नानावलीत पेट्रोलच्या जळत्या बाटल्या फेकल्या

भद्रकाली भागात घरे व वाहने जाळपोळीला आता राजकारणाचा धूर निघू लागला आहे. यात कथित गुंड वा नेत्याने पाच सराईतांना जाळपोळीसाठी सुपारी देत पेट्रोल पुरविल्याचे समोर येत आहे.सुपारी देऊन नानावलीत पेट्रोलच्या जळत्या बाटल्या फेकल्या. कारण भद्रकाली पोलिसांनी तपास करुन पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानुसार मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु झाला असून मत विभाजन, दहशत पसरविण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

भद्रकाली भागात घरे व वाहने जाळपोळीला आता राजकारणाचा धूर निघू लागला आहे. यात कथित गुंड वा नेत्याने पाच सराईतांना जाळपोळीसाठी सुपारी देत पेट्रोल पुरविल्याचे समोर येत आहे.सुपारी देऊन नानावलीत (Nanavali) पेट्रोलच्या जळत्या बाटल्या (Burning bottles of petrol) फेकल्या. कारण भद्रकाली पोलिसांनी तपास करुन पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानुसार मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु झाला असून मत विभाजन, दहशत पसरविण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.(They gave betel nuts and threw burning bottles of petrol in Nanavali)

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी संजय गावडे (२८, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (३१), प्रविण बाळू कराटे (२४, दोघे रा. विद्यानगर, मखमलाबाद), आकाश राजू साळुंके (२४, रा. दत्त चौक, सिडको), विजय सुरेश लोखंडे (२८, रा. आडगाव) अशी अटकेतील समाजकंटकांची नावे आहेत. सनी, प्रशांत व प्रविण यांना शनि शिंगणापूर येथून पकडण्यात आले. तर आकाश व विजय यांना नाशकातून पकडण्यात आले. प्राथमिक तपासात परिसरात दहशत पसरवण्यासाठी त्यांनी जाळपोळ केल्याची कबुली दिली.

गुरुवारी (दि.१६) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास वाकडी बारव, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासमोर, नानावली व शितळा देवी मंदिर परिसरात अज्ञात टोळक्याने ९ दुचाकी, एक ट्रक, टेम्पो अशा वाहनांना आग लावून जाळपोळ केली होती. जाळपोळीत तीन कारचेही किरकोळ नुकसान झाले होते. तसेच जहांगिर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून झोपलेल्या कुटुंबाचे घर जाळण्याचा प्रयत्न टोळक्याने केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तपास पथके नेमली. परिसरातील सीसीटीव्ही, यांत्रिक तपास, माहितगाराच्या माहितीनुसार संशयितांचा माग काढला. यानंतर आता पाचही संशयितांना शुक्रवारी (दि.२४) न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष नुरुटे, विक्रम मोहिते, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सहायक उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, हवालदार नरेंद्र जाधव, सतिष साळुंके, संदीप शेळके, पोलिस नाईक कय्युम सैयद, लक्ष्मण ठेपणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी