क्राईम

विवाहितेची आत्महत्या : भाजपच्या माजी नगरसेविकेसह मुलावर गुन्हा दाखल

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मखमलाबाद येथे राहत्या घरात गळफास घेत विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐन रंगपंचमीच्या दिवशी दोन लहान मुलांना सोडून आईने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माजी नगरसेविका सिंधू खोडे आणि तिच्या मुलाने मुंबई येथे फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरून आणण्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मखमलाबाद, मानकर नगर येथील धनंजय बंगल्यात शनिवार दि. ३० रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान गळफास घेत कावेरी आशिष खोडे (३३) हिने आत्महत्या केली.(Woman commits suicide: Ex-BJP corporator, son booked)

तिचा नवरा आशिष भीमराव खोडे हा तिच्यावर मागील अनेक दिवसांपासून संशय घेत, मद्यपान करून शिवीगाळ करीत होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून संयमाचा बांध सुटल्याने कावेरी हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कावेरीच्या कुटुंबीयांनी दिली. कावेरी हिच्या पश्चात एक ३ वर्षाची लहान मुलगी आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. कावेरी हीचा नवरा आशिष हा मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता असून, कावेरी हिची सासू सिंधू खोडे ही नाशिक मनपाची माजी नगरसेविका आहे.
घटनेनंतर सासरच्या व्यक्तींनी माहेरच्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करून निघून गेले. याबाबत म्हसरुळ पोलीस दखल घेत नसल्याने नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत आरोपी आशिष खोडे यास अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्यानंतर मधुकर भीमराव वायकंडे, ६२, रा. लोखंडे मळा, जुना सायखेडा रोड, दसक, नाशिक यांच्या फिर्यादीनुसार पोलिसानी हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडल्याने तणाव निवळला.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago