27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमविवाहितेची आत्महत्या : भाजपच्या माजी नगरसेविकेसह मुलावर गुन्हा दाखल

विवाहितेची आत्महत्या : भाजपच्या माजी नगरसेविकेसह मुलावर गुन्हा दाखल

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मखमलाबाद येथे राहत्या घरात गळफास घेत विवाहितेने आत्महत्या < Suicide > केल्याची घटना घडली आहे. ऐन रंगपंचमीच्या दिवशी दोन लहान मुलांना सोडून आईने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माजी नगरसेविका सिंधू खोडे आणि तिच्या मुलाने मुंबई येथे फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरून आणण्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मखमलाबाद, मानकर नगर येथील धनंजय बंगल्यात शनिवार दि. ३० रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान गळफास घेत कावेरी आशिष खोडे (३३) हिने आत्महत्या केली.(Woman commits suicide: Ex-BJP corporator, son booked)

तिचा नवरा आशिष भीमराव खोडे हा तिच्यावर मागील अनेक दिवसांपासून संशय घेत, मद्यपान करून शिवीगाळ करीत होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून संयमाचा बांध सुटल्याने कावेरी हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कावेरीच्या कुटुंबीयांनी दिली. कावेरी हिच्या पश्चात एक ३ वर्षाची लहान मुलगी आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. कावेरी हीचा नवरा आशिष हा मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता असून, कावेरी हिची सासू सिंधू खोडे ही नाशिक मनपाची माजी नगरसेविका आहे.
घटनेनंतर सासरच्या व्यक्तींनी माहेरच्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करून निघून गेले. याबाबत म्हसरुळ पोलीस दखल घेत नसल्याने नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत आरोपी आशिष खोडे यास अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्यानंतर मधुकर भीमराव वायकंडे, ६२, रा. लोखंडे मळा, जुना सायखेडा रोड, दसक, नाशिक यांच्या फिर्यादीनुसार पोलिसानी हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडल्याने तणाव निवळला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी