कोरोना मेला, जनता बेफिकीर, पुढारी मोकाट

अतुल माने

ज्येष्ठ पत्रकार

कोरोनाची पहिली लाट ओसरत आली आणि आता कोरोना नष्ट झाला या धुंदीत जनसामान्य बेफिकिरी मध्ये राहिले. मग यात राजकीय नेते कसे मागे राहतील. डिसेंबर आणि जानेवारी मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उठवण्यात आला (The dust of Gram Panchayat elections was raised in December and January).

यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची बीजे पेरली गेली (The seeds of the second wave of the corona were sown). हे कमी होते की काय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे परिवार संवाद यात्रा 28 जानेवारी पासून सुरू करण्यात आली. या मध्ये विदर्भ आणि खानदेश मधील 14 जिल्हे आणि 82 मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यात्रा सुरू केली आणि त्यामध्ये हजारो लोक सामील झाले. कोरोना नियमांचा साफ फज्जा उडाला. फेब्रुवारी पर्यंत 17 दिवस ही यात्रा सूर होती आणि इकडे दुसऱ्या लाटेचा श्री गणेशा त्याच विदर्भातून सुरू झाला आणि नंतर त्याचे रौद्र रूप सर्वांनी अनुभवले. त्यावेळी या संवाद यात्रेवर अनेकांनी टीका केल्या होत्या.

‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. सध्या दुसरी लाट ओसरत असताना लोकांची तीच बेफिकिरी वृत्ती पुन्हा सुरू झाली आहे. कोरोना संपला या धुंदीत अनेक जण पाहुण्यांना भेटायला गावो गावी फिरत आहेत. आणि हीच मोठी चूक ठरणार आहे. लस घेतली अथवा एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा होणार नाही या अज्ञानात आणि अति शहाणपण असल्यासारखे उठसुठ गावोगावी फिरणारे हे महाभाग आता सुपर स्प्रेडर ठरणार यात काहीच शंका नाही. त्यातच राष्ट्रवादी पुन्हा तीच चूक करत आहे. जयंत पाटील यांनी उस्मानाबाद येथून संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यातच डेल्टा प्लस या कोरोना विषाणूचा फेलाव सुरू झाला आहे (Delta Plus corona virus has begun to spread). तिसऱ्या लाटेचा श्री गणेशा झाला आहे.

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसची टक्कर

Coronavirus Covid 19 cases in India LIVE UPDATES: Travelling to Assam? No need for RT-PCR test if you have got both doses of Covid vaccine

एकीकडे लोकांना नियम पाळा, मास्क वापरा गर्दी करू नका असे उपदेश देणारे हे नेते यात्रा काढून त्याच नियमाला मुठमाती देत आहेत. जयंत पाटील हे खरे तर संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात. पण जी चूक जनतेने आणि त्यांनी पहिल्या लाटे नंतर केली तीच चुक पुन्हा आता करण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजाने म्हणावे लागते की कधी सुधारणार हे नेते आणि बेफिकिरी मध्ये असलेली जनता (Nilaja has to say that when will this leader and the people in disarray improve).

सोमवार पासून राज्यातील सर्व जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यात आणण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील नियम काटेकोर पाळून ही यात्रा जयंत पाटील स्थगित करतात का?  की यात्रा नियम दामटून सुरुच ठेवून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देतात हे लवकरच समजेल.

Rasika Jadhav

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

12 hours ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

13 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

14 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

15 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

15 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

16 hours ago