29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

टीम लयभारी

मुंबई :- अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक वस्तूनंतर आज काल मोबाईलसुद्धा जीवनावश्यक झाला आहे. मोबाईलमुळे माणसाचे जीवन सुलभ झाले आहे. आता मोबाईल वापरणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने जगातील सर्वात स्वस्त फोन उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. जिओ फोन नंतर रिलायन्सने जिओ फोन नेक्सटची घोषणा केली आहे (Reliance has announced Jio Phone Next after Jio Phone).

२४ जून २०२१ रोजी रिलायन्स जिओच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे सीईओ मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ आणि गुगल भागिदारीत जिओ फोन नेक्स्टची निर्मिती करणार आहेत. हा मोबाईल भारतातील ३० करोड ग्राहकांना २ जी वरून ४ जी वर येण्याची संधी देणार असल्याचे अंबानी यांनी म्हटले (Mukesh Ambani to bring world cheapest phone).

Mukesh Ambani to bring world's cheapest phone
जिओ फोन नेक्सट

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसची टक्कर

नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या फोनची वैशिष्ट्ये सांगितली. हा फोन ४ जी स्मार्टफोन असणार आहे. भारताच्या मेड इन इंडियाला हातभार लावण्याचा हा प्रयत्न असणार आहे. जिओ फोन नेक्सट गणेश चतुर्थीला म्हणजेच १० सप्टेंबर २०२१ ला बाजारात येणार आहे. या फोनची किंमत अद्याप सांगितलेली नाही.

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

Jio-Google phone dream for millions but only MRP will shake them up — when September comes

रिलायन्सने वार्षिक सर्वसाधारण सभेत इतर अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. नवी मुंबईमध्ये जिओ इन्स्टिट्युट सुरू होणार आहे. ज्यामध्ये ३ वर्षात १० लाख लोकांना नोकरीची संधी मिळणार असल्याची माहिती नीता अंबानी यांनी दिली. सौदी अरनको रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत भागिदारी करणार असल्याचे मुकेश अंबानींनी सांगितले (Saudi Aranco will partner with Reliance Industries Limited, said Mukesh Ambani).

Mukesh Ambani to bring world cheapest phone
मुकेश अंबानी

आता हे पाहणे गजेचे आहे रिलायन्स जिओ आणि गूगलने भागिदारीत निर्माण केलेल्या जिओ फोन नेक्सटला लोकांचा किती प्रतिसाद मिळतोय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी